गळती लागलेली मक्याची टाकी रिकामी न करता वेल्डिंग:दुर्घटनेला रॅडिकोच जबाबदार, औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अहवालात ठेवला ठपका

2 hours ago 2
रॅडिको कंपनीतील ३ हजार टन मका ठेवलेल्या टाकीला दुर्घटनेच्या २ दिवस आधीच गळती लागली होती. अशा स्थितीत टाकीला वेल्डिंगद्वारे ठिगळपट्टी करण्याचा १५ नोव्हेंबर केला. त्यामुळे टाकी पूर्ण फाटल्याने अपघात घडला व चार कामगारांचा बळी गेला. कंपनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला, असा ठपका औद्योगिक सुरक्षा व आरोग्य प्रशासनाने तपासणी अहवालात ठेवला आहे. कंपनी प्रशासनाला म्हणणे मांडण्यासाठी ७ दिवसांचा वेळ दिला आहे. त्यानंतर पुढील कारवाईसाठी केली जाणार आहे. गळक्या टाकीतच कंपनीकडून भरला जात होता मका कंपनीने म्हणणे मांडल्यानंतर मालकावर खटला आमच्या विभागामार्फत अपघाताचा सूक्ष्म तपास केला आहे. त्याचा अहवाल रॅडिको कंपनीला पाठवण्यात आला आहे. त्यावर ७ दिवसांत कंपनीने म्हणणे सादर करणे अनिवार्य आहे. त्यानंतर न्यायालयात कंपनी मालकाविरोधात खटला दाखल करण्यात येणार आहे. - प्रमोद सुरसे, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article