Aditi Tatkare connected MukhyaMnantri Ladki Bahin Yojna : राज्यातील अनेक महिलांनी योजनेसाठी अपात्र असूनही लाडकी बहिणचा लाभ घेतला. त्या महिला लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार की नाही? जाणून घ्या मंत्री आदिती तटकरे यांनी काय म्हटलं?
Aditi Tatkare Minister for Women and kid development
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात गेमचेंजर ठरली. महायुतीला सत्तेत आणण्यात ही योजना निर्णायक ठरली. आपल्याला दरमहा दीड हजारांऐवजी 2 हजार 100 रुपये मिळावेत या उद्देशाने लाभार्थी महिलांनी महायुतीला भरभरुन मतदान केलं. मात्र निवडणूक झाल्यानंतर अपात्र महिलांनी या योजनेचा फायदा घेतल्याचं समोर आलं. त्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींना दिलेली रक्कम परत घेणार का? असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. अखेर या प्रश्नाचं उत्तर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे. तसेच रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन सुरु असेल्या वादावरूनही आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. योजनेचं मूल्यमापन करणं यात काही नवीन नाही. इतर योजनेतही दरवर्षी मूल्यमापन केलं जातं. अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. तसेच शासनानं कुठलाही लाभ परत घेतला नाही, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.