अकोला (Akola Crime) : डाबकी रोड पोलिस स्टेशन हद्दीतील हॉटेल व्ही. एस. इम्पेरियल येथे उशिरारात्री एका लग्न समारंभातून सोन्याचे दागदागिने, रोख रक्कम व एक आयफोन असा एकूण सुमारे ७ते८लाख रुपयांची चोरी करून मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. या चोरीच्या घटनेत नवरीच्या आईचा महागडा आयफोनदेखील चोरट्यांनी पळविला आहे. सदर चोरीच्या घटनेची माहिती मिळताच (Akola Crime) वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
अकोला-बाळापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत हॉटेल व्ही.एस. इम्पेरियल आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते मनोहर पंजवानी यांच्या कुटुंबातील मुुलीचा लग्न समारंभ शुक्रवारी रात्री होता. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी नवरदेव-नवरीच्या स्टेजवर चढून येणारे नातेवाईक व पाहुणे मंडळी जे ‘गिफ्ट’ त्यांना देत होते, त्याच गिफ्टमधील आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागदागिने, तीन लाख रुपयांची रोख रक्कम व एक आयफोन किंमत एक लाख रुपये असा एकूण सुमारे ७ते८ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
ही बाब रात्री पंजवानी कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या चोरीची माहिती डाबकी रोड (Akola Crime) पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी शहर पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, डाबकी रोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धर्मराज सोनुने यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण व पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव यांनी धाव घेतली. सदर चोरीप्रकरणी शनिवारी अॅड. विशाल पंजवानी यांनी डाबकी रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. याच तक्रारीच्या आधारे डाबकी रोड पोलिसांनी चोरीचा गुन्हा अज्ञात चोरट्यांविरूध्द दाखल केला आहे.
चोरी करणारे चोरटे परराज्यातील!
हॉटेल व्ही.एस. इम्पेरियल येथे मनोहर पंजवानी यांच्या कुटुंबातील मुलीच्या लग्न समारंभात अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७ते८ लाख रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला आहे. या चोरीबाबत (Akola Crime) पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. त्यानुसार सदर चोरटे हे मध्यप्रदेश व राजस्थान या परराज्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पंजवानी कुटुंबीयांनी घेतली एसपींची भेट!
सदर चोरी प्रकरणाचा (Akola Crime) लवकरात लवकर छडा लावण्यासाठी शनिवारी दुपारी पंजवानी कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची भेट घेतली. लवकरच सदर चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात येईल, असा विश्वास पोलिस अधीक्षकांनी पंजवानी कुटुंबीयाकडे व्यक्त केला आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात
या (Akola Crime) चोरीप्रकरणी सीसीटीव्ही कॅमेर्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानुसार या चोरीचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.