भारत आणि इंग्लंड यांच्यात टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना मुंबईत होत आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यात भारताने मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. त्यामुळे हा सामना औपचारिक असल्याने भारतीय संघावर तसं कोणतं दडपण नसेल. त्यामुळे या सामन्यात काही खेळाडूंना फॉर्मात येण्याची संधी आहे. खासकरून कर्णधार सूर्यकुमार यादव फॉर्मात परतण्यासाठी प्रयत्नशील आहे. चार सामन्यात त्याला स्लोअर आर्म गोलंदाजी करून इंग्लंडने बरोबर गुंतवलं. त्यामुळे पाचव्या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दव फॅक्टर लक्षात ठेवून मोठा स्कोअर उभारण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
जोस बटलरने सांगितलं की, ‘आम्ही पॅचमध्ये काही चांगले क्रिकेट खेळलो. तरी आम्ही ते अधिक चांगल्या प्रकारे अंमलात आणायला हवे होते. गेममधील खास क्षण टिपण्याची गरज आहे. संघात चांगलं वातावरण आहे, एक चांगले ठिकाण आहे आणि खूप गर्दी आहे. ही एक चांगली विकेट आहे, मार्क वुड परत आला. दोन्ही संघ हाय-ऑक्टेन आहेत.’
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड