जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी डोक्यावर तबक घेऊन काढला मानाचा संदल…
परभणी (Parbhani) : जिल्हा परिषद यांत्रिकी विभाग येथून जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी डोक्यावर तबक घेऊन काढला मानाचा संदल. परभणी सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क साहेब दर्गा यांच्या ऊरसास (Oorus) सुरुवात झाली असून आज रविवार 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 30 वाजता परभणी शहरातील जिल्हापरिषद यांत्रिकी विभाग येथून जिल्हा परिषद वाहन (Zilla Parishad Vehicle) चालक आणि यांत्रिकी कर्मचारी संघटनेच्या वतीने मानाचा संदल काढण्यात आला.
यावेळी जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर (Natisha Mathur) यांनी डोक्यावर तबक घेवून संदलला सुरूवात केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोंसिकर, जीवन बेनीवाल, पंडित रेवनवार, सोनकांबळे साहेब, आर. एम. पवार, सदावर्ते सर, रामभाऊ, रेवनवार अप्पा, रोहिदास शिंगारे, यांच्यासह जिल्हा परिषद वाहन चालक व यांत्रिकी कर्मचारी संघटनेचे (Mechanical Workers’ Union) सदस्य या संदलमध्ये सहभागी झाले होते.