तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांनी तलावाला भेट
रिसोड (Asramata Lake) : रिसोड ते लोणार राज्यमार्गा लगत भर जहागीर नजिक आसरा माता तलाव आहे.या परीसरामध्ये आसरा माता मंदिर,मसोबा मंदिर,व तलावाच्या मध्य भागा मध्ये जगदंबा माता मंदिर आहे. तलावातील पाणी हे परीसराचे सौंदर्य खुलविते परंतु काही शेतक-यांनी अवैध पाणी ऊपसा केल्याने तलावाचे सौंदर्य लीप पावत आहे.या अवैध पाणिमी उपसा कायमचा बंद करण्याचा अल्टीमेट तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांनी शेतक-यांना दिला आहे.
तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर,मंडळाधिकारी समाधान जावळे,लाईनमन संदिप मुंढे यांनी तलाव परीसरातील अवैध पाणी उपसा,अवैध विज जोडणी करणा-या शेतक-यांच्या शेतावर जाऊन सक्त ताकीद देत तलावातील पाणी उपसा बंद करण्याचा शेवटचा अल्टीमेट दिला आहे. (Asramata Lake) आसरामाता तलाव परीसराला अनेक पर्यटक भेटी देतात.या ठिकाणी एस.जी.कंस्ट्रक्शन चे सुधिर जाधव यांनी कोट्यावधी रूपयांचा खर्च करीत तलाव परीसराचे सौंदर्य वाढविले आहे. जगदंबा माता मंदिर,सभागृह, तलावा मध्ये पर्यटकांना उतरण्यासाठी पाय-या,भक्तांच्या सुरक्षितेसाठी सिसिटीव्ही कॅमेरे,टिनशेड,आशा विविध प्रकारचे विकासात्मक कामे केली. परंतु तलावातील अवैध पाणी उपसा केल्याने या मंदिर परिसराचे सौंदर्य लोप पावत आहे.या तलावातील अवैध पाणी उपसा कायमचा बंद करण्या संदर्भात तहसीलदार तेजनकर यांनी शेतक-यांना ‘अल्टीमेट ‘दिला आहे.
– प्रतिक्षा तेजनकर(तहसीलदार रिसोड)
मंदिर परीसरातील काही शेतकरी रात्रीला तलावातील अवैध पाणी उपसा करत आसल्याचे दिसुन आले. हा उपसा तात्काळ बंद करण्या संदर्भात सदर शेतक-या अल्टीमेट दिला असुन या पुढे कोणीही तलावातील अवैध पाणी उपसा करतांनी दिसुन आल्यास धडक कारवाई करण्यात येईल.