Published on
:
20 Nov 2024, 5:28 pm
Updated on
:
20 Nov 2024, 5:28 pm
धारूर : तालुक्यात तीन मतदान केंद्रावर सव्वा सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. धारूर येथील जनता प्राथमिक विद्यालय तर कोळपिंपरी खोडस येथे उशिरापर्यंत मतदान सुरू होते. कोयाळ येथे सकाळी दोन गटात बचाबाची चे प्रकार वगळता दिवसभर शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. डोंगरपट्ट्यातील गावात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले .
धारूर तालुक्यात सकाळी अनेक गावात मतदान केंद्रावर शुकशुकाट होता तर शहरातील मतदान केंद्रावर गर्दी होती .डोंगरपट्ट्यातील अनेक गावातील ऊसतोड मजुरांचे स्थलांतर झाल्यामुळे २० ते २५ टक्क्याच्या जवळपास ऊसतोड मजूर मतदानापासून वंचित राहिला. काही उमेदवारांनी मतदारांना आणण्याचा प्रयत्न केला .परंतु नुकतेच स्थलांतरित झालेल्या मजुरांना मुकादमांची आणण्यास अडचण होती. यामुळे २० टक्क्याच्या जवळपास मतदानाची आकडेवारी काही गावात घटली आहे .सकाळी ग्रामीण भागात अनेक मतदान केंद्रावर एक ते दीड तास शुकशुकाट होता .दुपारनंतर गर्दी वाढली होती .शहरातील जनता प्राथमिक विद्यालयात असलेल्या ३७९ , ३८० , ३८१ या तीन मतदान केंद्रावर सायंकाळी सव्वा सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती .
कोळपिंपरी खोडस येथील मतदान केंद्रावरही उशिरापर्यंत मतदान सुरू होते .कोयाळ येथे सकाळी काही किरकोळ बाचाबाचीचा प्रकार वगळता दिवसभर तालुक्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली .दुपारच्या वेळी काही केंद्रावरच्या समोर मतदारांना उन्हा चटकेही सहन करावे 'लागले.अनेक मतदारांना आपले नाव मतदार यादीत नसल्यामुळे मतदान न करताच परतावे लागल्याचेही काही गावात प्रकार घडले.