Bigg Boss 18 Grand Finale: आज (19 जानेवारी 2025) ‘बिग बॉस 18’ चा ग्रँड फिनाले आहे. 15 आठवडे चाललेल्या या शोमध्ये आता फक्त 6 स्पर्धक उरले असून विजेत्याचे नाव लवकरच समोर येईल. विजेत्याला 50 लाखांची बक्षीस रक्कम मिळणार आहे. पण त्या सोबतच या शोमधून टॉप 6 स्पर्धकांनी नेमकी किती कमाई केली याबद्दलही चर्चा होताना दिसत आहे.
एका स्पर्धकाने तर मानधनाच्या बाबतीत सर्वांना मागे टाकलं आहे. या स्पर्धकाने शोमधून सर्वाधिक कमाई केल्याचं म्हटलं जात आहे. एवढच नाही तर या शोमध्ये त्याच्या मानधनाची असलेली रक्कम ही बक्षीसाच्या रक्कमेपेक्षाही जास्त आहे. पाहुयात की टॉप 6 स्पर्धकातील कोणी किती कमावले ते.
सर्वांपेक्षा या स्पर्धकाचे मानधन जास्त
आज तो दिवस आहे ज्याची प्रत्येकजण खूप दिवसांपासून वाट पाहत होता. 15 आठवड्यांपासून लोकांचे मनोरंजन करणारा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 18’ अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या मोसमाची ट्रॉफी कोण जिंकणार हे काही वेळाने कळेल. या शोची सुरुवात 18 स्पर्धकांनी झाली. आता फक्त 6 स्पर्धक उरले आहेत, जो कोणी विजेता होईल तो 50 लाख रुपयांच्या बक्षीसाची रक्कम जिंकणार आहे.
बक्षीसाच्या रक्कमेपेक्षा मानधनच जास्त
शोमधील सर्व स्पर्धकांची फी वेगवेगळी होती. पण विवियन डिसेनाने सर्वाधिक कमाई केली आहे. विवियनने दर आठवड्याला 5 लाख रुपये फी आकारली. शोच्या 15 आठवड्यांमध्ये त्याची एकूण कमाई 75 लाख रुपये झाली आहे.आणि जर तो शो जिंकला तर त्याला बक्षीस म्हणून आणखी 50 लाख रुपये मिळणार आहे.
त्यामुळे या शोमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक हा विवियन ठरला आहे. विवियन व्यतिरिक्त, करणवीर मेहरा, चुम दरंग आणि ईशा सारखे स्पर्धक देखील फिनालेच्या शर्यतीत आहेत. त्यांनी किती रक्कम कमावली ते पाहुयात.
इतर स्पर्धकांचे मानधन किती?
करणवीर मेहरा दर आठवड्याला 3 लाख रुपये आकरत असे, अविनाश मिश्रा दर आठवड्याला दीड लाख रुपये मानधन घेत होता तर, रजत दलाल दर आठवड्याला एक लाख रुपये मानधन आकारायचा, चुम दरंग दर आठवड्याला 2 लाख रुपये फी घ्यायचा आणि ईशा दर आठवड्याला 2 लाख रुपये मानधन घेत असे. त्यामुळे इतर स्पर्धकांच्या तुलनेत विवियनने माधनातून सर्वाधिक कमाई केली आहे.
आता या टॉप 6 पैकी ट्रॉफी आणि 50 लाख रक्कम आपल्या नावावर कोण करून घेतं हे पाहणं सर्वांसाठी औत्सुक्याचं आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष फिनालेकडे लागले आहे. कोण बनणार ‘बिग बॉस 18’ चा विजेता? हे गुपित काही तासांनंतर उघड होईल.