Budget 2025 Speech Live : आता काही वेळातच देशाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा हा आठवा अर्थसंकल्प असणार आहे. तर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा पूर्ण बजेट असणार आहे. आजच्या अर्थसंकल्पाकडून सामान्य नागरिक आणि मध्यमवर्गीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. येत्या 5 तारखेला दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळेही आजच्या बजेटमध्ये मोदी सरकार काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा पूर्ण बजेट आहे. तर निर्मला सीतारामण या आठव्यांदा बजेट सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठी मिळण्याची शक्यता आहे. तसेच जीएसटीच्या अनुषंगानेही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, महिला आणि रेल्वेवर अधिक फोकस असणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे देशाचा हा अत्यंत महत्त्वाचा बजेट पाहण्यासाठी टीव्ही9 मराठीच्या युट्यूब लिंकला आवश्य क्लिक करा…
Published on: Feb 01, 2025 11:12 AM