केंद्रीय अर्थसंकल्पातून काय नवी घोषणा होणार याकडे संपूर्ण उद्योग क्षेत्रातचे आणि शेअर बाजाराचे लक्ष होते. पण अर्थसंकल्पाकडून शेअर बाजाराची निराशा झाली. बाजाराचा मूड गेला अन् शेअर बाजाराने रेड सिग्नल दिला.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली असली तरी शेअर बाजाराला अर्थसंकल्प आवडला नाही. आणि शेअर बाजारात घसरण दिसून आली. अर्थमंत्री सीतारामन यांनी नवी कर रचना जाहीर केलीय. पण नवी कर विधेयक हे पुढच्या आठवड्यापासून लागू होईल, असेही सीतारामन यांनी सांगितले.
अर्थसंकल्प सादर होत असताना शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स 100 अंकांनी आणि Nifty 51 अंकांनी घसरला. शेअर बाजारातील या घसरणीचा मोठा फटका सरकारी कंपन्यांना बसला. आरव्हीएनएल, माझगाव डॉक, बीडीएल आणि एनएचपीसी या शेअरमध्ये घसरण दिसून आली. इन्फ्रा म्हणजे पायभूत सुविधा निर्माण कंपन्यांच्या शेअरमध्ये संमिश्र यामुळे गुंतवणूकदार सावध दिसून आले.