छत्तीसगडच्या गंगालूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; ८ नक्षलवादी ठारFile Photo
Published on
:
01 Feb 2025, 11:26 am
Updated on
:
01 Feb 2025, 11:26 am
पुढारी ऑनलाईन :
छत्तीसगडच्या गंगालूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चमकमकीत ८ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. गंगालूरमध्ये नक्षली दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी कारवाई केली असता, गंगालूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सकाळपासून चकमक सुरू होती. यामध्ये ८ नक्षलवादी ठार झाले.
डीआरजी, एसटीएफ, कोबरा, सीआरपीएफ 222 यांची संयुक्त टीम नक्षलविरोधी अभियान राबवित असताना ही चकमक झाली. सदर क्षेत्रात नक्षल दबा धरून बसले असल्याची माहिती मिळाली होती. ज्वाइंट ऑपरेशनने सकाळ पासूनच पोलीस आणि नक्षल यांच्यात चकमक सुरु होती. यामध्ये 8 नक्षली मारले गेले व अन्य सामग्री हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.