पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचला. जगदीश याला पोलिसांच्या हालचालींची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. झडती घेतल्यावर त्याच्या बॅगमध्ये आयफोन, विवो, ओपो, रियलमी, रेडमी यांसारख्या विविध कंपन्यांचे एकूण 16 मोबाईल फोन सापडले, ज्यांची किंमत 3 लाख 20 हजार रुपये एवढी आहे.
पोलिसी तपासात त्याने निगडी, पिंपरी, चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातील गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले. या गुन्ह्यातून निगडी, दौंड, सासवड, स्वारगेट पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
जगदीश हा मूळचा झारखंडचा असून पुणे रेल्वे स्थानक परिसरात वास्तव्यास होता. तो दिवसभर गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करून त्यांची विक्री करण्याचा नवा फंडा वापरत होता.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, दीपक खरात, देवा राऊत, संदेश देशमुख आणि तेजस भालचिम यांच्या पथकाने केली.