छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा ख्तमा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात शनिवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही चकमक झाली. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर होते. घटनास्थळी शोध मोहीम सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
जिल्हा राखीव रक्षक, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि त्यांची विशेष युनिट कोब्राचे सैनिक या कारवाईत सहभागी आहेत. पश्चिम बस्तर विभागात माओवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे शुक्रवारी ही कारवाई सुरू करण्यात आली होती. घटनास्थळाहून नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे. जिल्हा राखीव रक्षक आणि केंद्रीय राखीव पोलीस दल आणि त्याची एलिट युनिट कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शन यांच्यासह राज्य पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सचे कर्मचारी या ऑपरेशनमध्ये सहभागी होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील या क्षेत्रात नक्षल दबा धरून बसले असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर ज्वाइंट ऑपरेशनने सकाळ पासूनच पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. त्यात 8 नक्षलवाद्यांचा खत्मा करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळाहून नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. पश्चिम बस्तर विभागातील माओवादी कॅडरच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी ही कारवाई सुरू करण्यात आली. जिल्हा राखीव रक्षक (DRG), राज्य पोलिसांचे विशेष टास्क फोर्स (STF) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या एलिट युनिट CoBRA (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ऍक्शन) सह कर्मचारी या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते.