एआय तंत्रज्ञानामुळे नव्या रोजगार संधी:एआय तंत्रज्ञान आत्समात करणे गरजेचे, विश्व मराठी संमेलानात आयटी तज्ज्ञांची भूमिका

3 hours ago 1
पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात सुरू असलेल्या विश्व मराठी संमेलनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. आचार्य प्र. के. अत्रे रंगमंचावर 'मराठी भाषेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर' या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले, आयटी तज्ज्ञ अद्वैत खरे आणि अभिषेक सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला. तज्ज्ञांच्या मते, एआय तंत्रज्ञानामुळे सध्याच्या नोकऱ्यांमध्ये मोठे बदल होणार असले तरी नवीन रोजगार संधी निर्माण होतील. एआय तंत्रज्ञानाला भाषेचे बंधन नसल्याने मराठी भाषेला फायदा होण्यासाठी अधिकाधिक मराठी माहिती निर्माण करणे आवश्यक आहे. अच्युत गोडबोले यांनी एआयच्या विकासाचा आढावा घेताना सांगितले की, १९८० च्या दशकात मशीनला माणसासारखा विचार करण्याची क्षमता देण्याचा विचार पुढे आला. २००० मध्ये मशीन लर्निंग आणि २०१७ मध्ये जनरेटीव्ह एआय विकसित झाला. सध्याचा एआय बुद्धिमत्तेत माणसाच्या पुढे जात असल्याने त्यावरील नियंत्रणाबाबत एलन मस्कसह अनेक तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. तज्ज्ञांनी एआयचे दुष्परिणामही मांडले. उदाहरणार्थ, केवळ नावावरून व्यक्तीवर गाणे तयार करणे किंवा अब्राहम लिंकन आणि मधुबाला यांसारख्या व्यक्तींचे काल्पनिक गाणे तयार करणे शक्य झाले आहे. एआयमुळे मानवी व्यवहार बदलणार असून, या बदलांना सामोरे जाण्यासाठी तयार राहणे आवश्यक आहे. परिसंवादाचे संचालन देवदत्त भिंगारकर यांनी केले, तर जगतानंद भटकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. खरे यांच्या म्हणण्यानुसार, एआय सध्या स्वतःचे निर्णय घेतोय. तो आता एवढा बुद्धीवान होत आहे की, कविता रचण्यापासून ते पुस्तक लिहिण्यापर्यंत काहीही करू शकतो. त्यामुळे जगाची झोप उडाली आहे. भविष्य जग हे दोन भागात विभागले जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने एआय वापरणारे आणि एआयचा वापर न करणारे, असे चित्र निर्माण होणार आहे. एआयला मराठी भाषा आणि भाषांतर कळायला लागले आहे. त्यामुळे मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी फायदा होणार आहे. उत्तम कंटेंट मराठीत येणार आहे.आपला स्पर्धक म्हणून एआय येणार आहे. तो आताच एवढं चांगलं लिहीत असेल, तर आगामी काही वर्षात तो आपल्यापुढे गेलेला असेल. त्यामुळे आपला सर्जनशीलतेला भाग त्याने नेला, तर समस्या निर्माण होणार आहे. कॉपी राईट प्रश्न निर्माण होणार आहे. एआय आउटपुट देत, ते इनपुटवर आधारित आहे. हे इनपुट अनेकांच्या माहितीवर आधारित आहे. एआय हा उत्कृष्ट शिक्षक आहे. त्याचा मराठीत फायदा होणार असल्याचे खरे यांनी स्पष्ट केले.एआयचे तंत्रज्ञान पुढे गेले आहे. सर्वसाधारण व्यक्तीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. मी काही सेकंदात पारंपरिक आणि नव्या पिढीचे गाणे तयार केले आहे. एआयसोबत आपण कसे काम करू शकू, याचा आतापासून विचार करायला हवा. त्याचा वापर प्रत्येक क्षेत्रातच होणार आहे. चुका कमी झाल्या आहेत. तुमची रटाळ कामे एआय सहज करू शकतो.त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. एआयच्या उत्तम वापरसाठी डिजिटल ट्रॅक रेकॉर्ड ठेवा. आगामी काळात तो एक चांगला एजेंट म्हणून काम करणार आहे. एखादी कविता किंवा लेख नक्की एआयने लिहिले किंवा मनुष्याने लिहिले हे कळणार नाही. शोध निंबध लिहिता येईल. आपली मराठी मातृभाषा असल्यास, त्यावर प्रभुत्त्व हवे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. एआयमुळे जॉब जातील तेवढेच नव्याने निर्माण होतील. एआय च्या वापरामुळे अनेक तज्ज्ञ ७० टक्के नोकऱ्या जातील, असे म्हणत आहेत मात्र, माझ्या मते हे प्रमाण कमी होईल. प्रत्येक क्षेत्रातील 'लो लेव्हल' जॉब्स जातील. मात्र, त्यापेक्षाही सध्या अस्तित्वात असलेल्या रोजगाराचे स्वरूप फार झपाट्याने बदलणार आहे. भविष्यात एआय तंत्रज्ञानाची माहिती असणाऱ्यांना फायदाच अधिक होणार आहे. विद्यार्थ्यांनी एआयबाबत वाचन करावे आणि त्याची माहिती करून घ्यावी, असे आवाहन अच्युत गोडबोले यांनी केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article