केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून बजेट वाचन सुरु आहे. त्या मोदी 3.0 सरकारच दुसरं बजेट मांडत आहेत. निर्मला सीतारमण यांच्या बजेटकडे सगळ्यांचच लक्ष लागलं आहे. सर्वसामान्य, नोकरदार, व्यापारी आणि उद्योजक सगळ्यांचेच या बजेटकडे डोळे लागले आहेत. निर्मला सीतरमन यांच्या बजेटकडून काय मिळणार? हीच प्रत्येक घटकाची अपेक्षा आहे. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करताना अर्थव्यवस्थेचा वेग वाढवणं आणि नव्या नोकऱ्यांची निर्मिती हा बजेट मांडताना निर्मला सीतारमण यांचा उद्देश असेल. निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये विविध घोषणा केल्या आहेत. त्यामुळे काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत, तर काही महागल्या आहेत. त्या बद्दल जाणून घेऊया.
कुठली औषध स्वस्त?
36 जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट जाहीर झाली आहे. कॅन्सरची औषधं स्वस्त होणार आगहे. कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली आहे.
काय स्वस्त होणार?
टीव्ही, मोबाईल, औषध आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार आहे. मोबाईल फोन, एलईडी, एलसीडी टीव्ही, चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. अर्थसंकल्पात तशी घोषणा झाली आहे.