चिखली (Buldana) :- रात्रीच्या वेळी घरामध्ये पती व १० वर्षाची मुलगी गार झोपेत असतांना कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली . शोध घेतला असता कुठेही मिळून आली नाही अशी तक्रार २७ सप्टेंबर रोजी विवाहितेचे पती यांनी पोलीस स्टेशनला (Police station)दिली.
तिने कोणालाही काहीही न सांगता घरातून गेली निघून
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंत्री खेडेकर येथील रहिवाशी असलेले ज्ञानेश्वर शिवनारायण खेडेकर वय ३३ वर्ष यांनी तक्रारी मध्ये नमूद केले आहे की प्रकारे आहे की यातील नमुद घतावेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट (Report)दिला की पत्नी नामे पूजा ज्ञानेश्वर खेडेकर वय २४ वर्ष ही दिनांक २६ सप्टेंबर रोजी आम्ही सर्वांनी जेवण करून घरात झोपलो होतो. त्याच रात्री १ वाजेच्या दरम्यान आम्ही गार झोपेत असताना पत्नी ही १० वर्षाची मुलीला सोडून घरातून निघून गेली.आम्ही बराच वेळ वाट पाहील पण परत आली नाही म्हणून नातेवाईकाकडे आजूबाजूला शोध घेतला असता कुठेही मिळून आली नाही. तिचे वर्णन- रंग सावळा चेहरा – गोल, वर्ण – गोरा केस -लांब काळे , उंची – ५ फूट , बांधा मजबूत ,काळसर गाऊन त्यावर फुलाची डिझाईन डाव्या हाताच्या मनगटावर DNYANU असे गोंदलेले, हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या व सोबत व्ही 21A कंपनीचा आकाशी रंगाचा मोबाईल त्यामध्ये जिओ कंपनीचे सिम कार्ड त्याचा नंबर ९५२९५६०६०३ सोबत नेलेला आहे जर अशा वर्णाची विवाहिता कोणालाही दिसुन आल्यास जवळचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील बिट जमादार कैलास उगले कैलास उगले मोन.८८३०२६५२१४ वर संपर्क साधावा असे नमूद केले आहे .