Published on
:
22 Jan 2025, 9:47 am
Updated on
:
22 Jan 2025, 9:47 am
पालघर : पुढारी वृत्तसेवा
नॅशनल हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या सरेखना अंतर्गत महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या कामात ४० मीटर लांबीच्या स्पॅन असलेला पहिला फुल स्पॅन प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट बॉक्स गर्डर बसवण्यात आला आहे. ४० मीटर लांबीच्या पीएससी बॉक्स गर्डर सुमारे ९७० मेट्रिक टन वजनाचा आहे.
भारतातील बांधकाम उद्योगातील सर्वात वजनदार पीएससी बॉक्स गर्डर आहे. ४० मीटर स्पॅन गर्डर हा एकच तुकडा म्हणून म्हणजेच कोणत्याही बांधकाम संयुक्ताशिवाय टाकण्यात आला आहे. गर्डर तयार करण्यासाठी ३९० घनमीटर काँक्रीट आणि ४२ मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत वायडक्टचे बांधकाम, उपरचना आणि सुपरस्ट्रक्चरचे बांधकाम जलद गतीने करण्यासाठी समांतर कामे हाती घेण्यात आली आहेत. तर पायल कॅप, पियर आणि पियर कॅप, प्रगतीपथावर आहे. सुपरस्ट्रक्चरसाठी कास्टिंग यार्ड विकसित करण्यात आले आहेत. फुल स्पॅन गर्डर आणि सेगमेंटल गर्डर टाकण्यासाठी संरेखन ते कास्टेड पिवर कॅप्सवर जड मशिनरी वापरून प्रक्षेपित केले जाणार आहेत.
सुपरस्ट्रक्चरसाठी बहुतेक गर्डर ४० मीटर लांबीचे असतील, ज्या ठिकाणी जागेची कमतरता आहे, तेथे प्रीकास्ट सेगमेंटचे सेगमेंटल लॉन्चिंग वापरले जाईल. सेगमेंटल गर्डरपेक्षा फुल स्पॅन गर्डरला प्राधान्य दिले जाणार आहे. फुल स्पॅन गर्डर लॉचिंगची प्रगती सेगमेंटल गर्डर लॉचिंगपेक्षा दहा पट वेगवान आहे.
गर्डर कास्टिंगसाठी महाराष्ट्रातील शिळफाटा ते गुजरात-महाराष्ट्र सीमेदरम्यानच्या मार्गावर १३ कास्टिंग यार्ड विकसित करण्यात येत आहेत. त्यापैकी ३ सद्य स्थितीत कार्यान्वित करण्यात आले आहेत.
दर्जेदार गर्डर जलद गतीने कास्टिंग करण्यासाठी प्रत्येक कास्टिंग यार्डमध्ये रिवार पिंजरा तयार करण्यासाठी जिग, हायड्रोलिक ऑपरेटेड प्रीफॅब्रिकेटेड मोल्डसह कास्टिंग बेड, बंचिंग प्लांट, एकूण स्टॅकिंग एरिया, सिमेंट सायलो, दर्जेदार प्रयोगशाळा आदी सुविधा विकसित केल्या जात आहेत. स्ट्रॅडल कॅरियर, ब्रिज लाँचिंग गॅन्ट्री, गर्डर ट्रान्सपोर्टर आणि लॉचिंग गॅन्ट्रीसारख्या अवजड यंत्रसामग्रीचा वापर करून फुल स्पॅन प्री-कास्ट बॉक्स गर्डर लाँच केले जातील. लॉचिंगसाठी गर्डरचा अखंड पुरवठा व्हावा, यासाठी बॉक्स गर्डरचा कास्टिंग यार्डमध्ये पद्धतशीरपणे साठा केला जाणार आहे.
७ बोगद्यांची कामे प्रगतीपथावर एप्रिल २०२१ पासून गुजरात विभागात अशाच प्रकारचे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. २५५ किमी वायडक्ट बांधकाम आधीच पूर्ण झाल्यामुळे वायडक्ट बांधकामात भरीव प्रगती झाली आहे. महाराष्ट्र विभागात एकूण १३५ किमी उंच विभाग आहे.
उल्हास, वैतरणा, जगणी आणि खरबाव येथे नदीवरील पुलांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग, डीएफसीसी आणि भारतीय रेल्वे मार्गावर ११ विशेष पूल तसेच क्रॉसिंग उभारले जाणार आहे. ठाणे, विरार, बोईसर येथील तीन बुलेट ट्रेन स्थानके आणि सात बोगदे तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.