चंद्रपूर(Chandrapur) :- नोकरीमध्ये असलेले सामाजिक आरक्षण संपविणारी देशातील पहिली बँक म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख निर्माण होत असल्याचे खळबळजनक वक्तव्य राज्याचे माजी मंत्री, भाजपा नेते आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांनी केले आहे .
बँकेकडून शिपाई व लिपिक पदाच्या 358 पदांसाठी नोकरभरती
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शिपाई व लिपिक पदाच्या 358 पदांसाठी नोकरभरती केली जात आहे. मात्र या भरतीमध्ये ओबीसी(OBC), एससी(SC), एसटी, एनटी या प्रवर्गासाठी कुठलेही आरक्षण न ठेवता सरळ सरळ सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरण्याचा घाट बँकेने घातला. या विरोधात बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले . या उपोषणस्थळी मुनगंटीवार यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत घेण्यात आलेल्या नोकर भरतीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार करण्यात आले. याविरोधात परीक्षार्थी संतापून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला. उपोषणास बसलेल्याना काही कमी जास्त झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व सहकार खात्याची राहील असा इशारा मुनगंटीवार यांनी दिला.