सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा मुक्त वापर होत आहे. शाळा-महाविद्यालयातील तरुणांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत त्याचा वापर वाढला आहे. अनेक प्रकल्पासाठी एआय ॲपचा वापर वाढला आहे. ChatGPT-DeepSeek प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. पण मोदी सरकारने एआयचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट जाहीर केला आहे. वित्त मंत्रालयाने सरकारी कार्यालयातील लॅपटॉप, पीसी अथवा शासकीय इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये कोणत्याही एआय ॲपचा वापर न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गोपनिय माहिती आणि डाटा चोरीचा धोका असल्याचे मोदी सरकारने स्पष्ट केले आहे.
परदेशी AI Apps चा वापर धोकादायक
सध्या भारतात ChatGPT, Deepseek आणि Google Gemini ही परदेशी AI Apps चा वापर होतो. तर इतर पण अनेक AI Apps आहेत. काम सोपे होण्यासाठी त्यांचा वापर होतो. वेळेची बचत होते आणि झटपट काम होते, म्हणून त्यांचा सर्रास वापर होत आहे. पण हे एआय ॲप पहिल्यांदा वापर करताना डेटा परवानगी घेतात. त्यांना सर्व ॲसेस मिळाल्यावर संबंधित लॅपटॉप, पीसी, मोबाईलची हेरगिरी होण्याची भीती असते. त्यामुळे मोदी सरकारने तातडीने हा निर्णय घेतला आहे.
हे सुद्धा वाचा
एआय ॲप्स आणि एआय चॅटबोटच्या मदतीने अनेक लोक प्रोम्प्ट देऊन पत्र, लेख तयार करणे अथवा भाषांतर करतात. तर अनेक सरकारी कर्मचारी या एआय ॲपच्या मदतीने सादरीकरण, प्रेझेंटेशन करतात. त्यासाठी फार कष्ट पडत नाहीत. केवळ एक टेक्स्ट प्रोम्ट करून हे काम करता येते.
Deepseek ठरले लोकप्रिय
चीनचे स्मार्टॲप डीपसीक सध्या लोकप्रिय ठरले आहे. या स्टार्टअपने किफायतशीर दरात सेवा उपलब्ध करुन दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. चीनचे हे स्टार्ट ॲप जवळपास 20 महिने अगोदर सुरू झाले होते. 20 जानेवारी 2025 रोजी डीपसीक आर1चॅटबोटच्या वापरात अचानक तेजी आली. त्याने अनेक AI कंपन्यांची झोप उडवली आहे. अमेरिकेत डीपसीकविरोधात लवकरच मोठी कारवाई पाहायला मिळाल्यास वावगे ठरू नये. भारत पण लवकरच स्वतःचे एआय ॲप येणार आहे.