हॉलिवूड, जापनीज किंवा कोरियन चित्रपट आता हिंदी, तामिळ एवढंच काय पण काही चित्रपट तर मराठीमध्ये ही डब केलेले पाहायला मिळतात. आपले भारतीय चित्रपटही विशेषतः हिंदी चित्रपट अनेक भाषांमध्ये जगभरात पोहोचत आहेत, आणि मुख्य म्हणजे आपले भारतीय चित्रपट तेवढे पसंत ही केले जातात.
पण गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपट देशाबरोबरच परदेशातही दिसून येत आहे. यातीलच सध्या विजय सेतुपतीचा तमिळ ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘महाराजा’ जसा ईथे गाजला तसंच हा चित्रपट चीनमध्ये बक्कळ कमाई करत आहे.
विजय सेतुपतीच्या चित्रपटाने चिनी प्रेक्षकांचीही मने जिंकली
या चित्रपटाने भारतातीलच नाही तर चिनी प्रेक्षकांचीसुद्धा मने जिंकली. विजय सेतुपतीचा तमिळ चित्रपट ‘महाराजा’ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चिनी सिनेमागृहांमध्येदेखील प्रदर्शित झाला. याच चित्रपटासंबंधातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये चिनी प्रेक्षक थिएटरमध्ये हा चित्रपट पाहताना खूप भावूक होतानाचं चित्र दिसत आहे. हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. चित्रपटातील काही सीन्स पाहून थिएटरमधली प्रेक्षक अक्षरशः हुंदके देऊन रडताना दिसतायत.
भारतीय चित्रपट हे जगाला वेड लावणारे
‘एक्स’वरील (ट्विटर) गब्बर या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये युजरने लिहिले आहे की, “भारतीय वडील-मुलीवर आधारित चित्रपट चीनमध्ये नेहमीच चांगले प्रदर्शन करतात. दंगल, सिक्रेट सुपरस्टार आणि आता महाराजा.” यावरूनच हे समजत की आपले भारतीय चित्रपट हे जगाला वेड लावणारे आहेत आणि ते जगभरात तेवढे पसंतही केले जातात.
दरम्यान महाराजा हा गेल्या पाच वर्षांतील चीनमधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. आता हा चित्रपट 100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये पोहोचणार आहे. चीनमधील भारतीय दूतावासाच्या स्पिकर ‘यू जिंग’ यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “महाराजा’ हा 2018 नंतरचा चीनमधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला असून त्याने आत्तापर्यंत 91.55 कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. अभिनंदन!”
Somehow Father-daughter Indian movies bash truly good successful China. Dangal, Singing Superstar and present Maharaja. pic.twitter.com/CeSlNPDknk
— Gabbar (@GabbbarSingh) January 4, 2025
विजय सेतुपतींची भावनिक प्रतिक्रिया
विजय सेतुपतीच्या महाराजा शिवाय, आमिर खान यांचे ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’, आयुष्मान खुरानाचा ‘अंधाधुन’ आणि राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हे चित्रपटही चीनमध्ये खूप गाजले होते.
चित्रपटाच्या यशाच्या निमित्ताने केरळमध्ये मिडियाशी बोलताना विजय सेतुपती म्हणाला होता की, “हा चित्रपट तामिळनाडूमध्ये चांगला चालेल असे आम्हाला वाटले होते. परंतु राज्याबाहेरही मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. प्रेक्षकांनी चित्रपटातील प्रत्येक अभिनेता आणि तंत्रज्ञावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. मी काय बोलावे हेच समजत नाही!”
या चित्रपटाचे दिग्दर्शक निथिलन समितान आहेत. विजय सेतुपतीसोबत ‘महाराजा’मध्ये अनुराग कश्यप, ममता मोहनदास, नट्टी सुब्रमणियम, अभिरामी गोपिकुमार, दिव्या भारती, सिंगमपुली, अरुळदोस, मुनिशकांथ, सचना नमीदास, मणीकंदन आणि भारथीराजा यांसारख्या दिग्गजांचा देखील दमदार अभिनय पहायला मिळाला.