भाजपाचे बीडचे आमदार सुरेश धस सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांनी मस्साजोगचे आमदार संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरल्याने ते कायम टीव्हीवर झळकत आहेत. त्यांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री झाल्यनंतरचा जाहीर कार्यक्रम बुधवारी झाला. या कार्यक्रमात त्यांनी तुफान टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी बीडच्या सध्याच्या परिस्थितीवर देखील राजकीय टोलेबाजी केली. ते म्हणाले की काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठबळ दिल्याने जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती. पण फडणवीस साहेब तुम्ही संतोष देशमुखच्या प्रकरणात कणखर भूमिका घेतली.. असे म्हणून ते म्हणाले की,’ जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा… ते पुढे म्हणाले की आवडली साहेब… सर्वांना आवडली. तुम्ही म्हणाले, कुणाला सोडणार नाही. यावर आमचा विश्वास आहे. अजून राख, वाळू, भूमाफीया यांनाही मोका लागला पाहिजे ही विनंती आहेत…
आपल्या भाषणात सुरेश धस पुढे म्हणाले की १९९९ ते २०२४ पाच वर्षे साहेबांचे कागद, त्यांचा बॉक्स खालून वर काढून द्यायचं काम मी करायचो. तुमच्यासोबत बसण्याची संधी मिळाली. मी फार छोटा माणूस आहे. गंगाधर फडणवीस तरी एमएलसी होते. माझा बाप ग्रामपंचायतीचा सदस्यही झाला नाही. तरीही तुम्ही मला शेजारी बसण्याची संधी दिली. त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो असेही आमदार सुरेश धस यावेळी म्हणाले.
तुम्ही बिनजोड पैलवान
साहेब, माझ्यावर हरळ उगवली असती. २०१९ पासून माझ्याविरोधात कट कारस्थान झाले. माझ्या कुटुंबियांवर कारस्थान झालं. पण तुम्ही माझ्या पाठी दत्त म्हणून उभा राहिला. जनादेश तुमच्या बाजूने होता. पहाटेच आपला जनादेश चोरून नेला. ज्याप्रकारे तुम्हाला राजकीय आणि कौंटुबीक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यातून आपण शांतपणे बाहेर आला. त्याला तोडच नाही. तुम्ही बिनजोड पैलवान आहात असे यावेळी धस यांनी फडणवीस यांचे कौतूक करताना सांगितले.
हे सुद्धा वाचा
धस यावेळी म्हणाले की तुम्ही विरोधी पक्षनेता असताना भाजपचे १०६, वरचे २६. त्यात मी होतो. मला निवडून आणण्यासाठी तुम्ही आणि पंकजा ताईंनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला. आपले राजकीय कौशल्य आणि व्यक्तीगत जिव्हाळा होता. तुमच्या प्रेमामुळे एकही माणूस फुटला नाही. आता कुणाचे घरं पाडा, काय करा, आमच्यावर ३०-३० गुन्हे दाखल झाले. रात्री ११.३० वाजता पोलीस पाठवायचे. एवढा त्रास आम्हाला दिला असेही धस यांनी यावेळी सांगितले.
मेरे पास देवेंद्र फडणवीस है
मी दिवार सिनेमा पाहिला होता. दिवार. कॉलेजमध्ये असताना. त्यात अमिताभ आणि शशी कपूर भाऊ भाऊ असतात. निरुपा राय त्यांची आई असते. शशी कपूर इन्सपेक्टर असतो. अमिताभ झंटाफंटा दाखवला. अमिताभ शशी कपूरला म्हणतो, मेरेपास गाडी है, बंगला है, नोकर है, चाकर है तुम्हारे पास क्या है… त्यावेळी शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है. तसा आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय. तुमच्यासारखा नशिबवान कोणी नाही. माझी आई गेली. वडील गेले. माझी दुसरी आई जिवंत आहे. माझी आई मी लपवली नाही साहेब. सभागृहात मी विचारलं माझ्या आईचं नाव घेऊ का. मी माझ्या दुसऱ्या आईचंही नाव घेतलं. साहेब, तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं मला काही तरी मिळेल. मला मंत्रीपद नाही दिलं तरी, मी म्हणतो मला मंत्रीपद नको, पालकमंत्रीपद नको. काही देऊ नका. हे चार टीएमसी, तिकडचे साडे तीन टीएमसी पाणी द्या असे सांगत धस पुढे म्हणाले की मला हिणवतात. काय आहे याचं मुख्यमंत्र्यापाशी. मला विचारता…तेरे पास क्या है. मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद असाच ठेवा अशी मागणी धस यांनी यावेळी केली.