Illegal Immigrants : अमेरिकेत जाऊन तेथे डॉलरमध्ये कमाई करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जगभरातील लोक अमेरिकन व्हीसा मिळण्यासाठी जंगजंग पछाडत असतात. परंतू अमेरिकेत जाणे इतके सोपे नाही. तेथील व्हीसा आणि नागरिकत्वाचे कठोर नियम आहेत. त्यामुळे हजारो लोक अमेरिकेत बेकायदेशीरपणे घुसखोरी करीत असतात. अशा लोकांवर आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनी कारवाई सुरु केली आहे, यात भारतीय लोकांची संख्या मोठी आहे. अमेरिकेतून अनेक भारतीयांना डिपोर्ट करण्यात आले आहे. अशात अमेरिकेत सर्वाधिक बेकायदा लोक कोणत्या देशाचे आहेत ? असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे.तर पाहूयात कोणत्या देशाचे लोक अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहातात पाहूयात..
या देशाचे लोक सर्वाधिक
तुम्हाला जर वाटत असेल की भारताचे लोक अमेरिकेत सर्वाधिकपणे बेकायदेशीरपणे रहात आहेत, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण जगातील इतर देशात अमेरिकेत जाऊन वसण्याची ओढ सर्वाधिक आहे. मेक्सिको या देशाचे सर्वाधिक बेकायदेशीर लोक अमेरिकेत रहातात. ज्यांच्यावर अटकेची कारवाई किंवा डिपोर्टटेशनची टांगती तलवार कायम आहे. प्यु रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत एक कोटीहून अधिक लोक अधिकृतपणे रहात आहेत. ज्यात सुमारे ४० लाख लोक एकट्या मेक्सिकोचे आहेत.
भारताच्या एवढ्या लोकांना धोका
साल २०२२ च्या आकडेवारीनुसार अमेरिकेत भारताचे सुमारे ७ लाख बेकायदेशीरपणे रहात आहेत. यापैकी अनेक लोकांना आता जबरदस्तीने भारतात पाठवले जात आहेत. ज्या डिपोर्ट करणे असे म्हणतात. या लोकांकडे अमेरिकेत रहाण्यासाठीची कोणतीही कागदपत्रे नाहीत. यांना अमेरिकन पोलीस पेपरलेस कॅटेगरीत टेवते.
हे सुद्धा वाचा
अशी होते कारवाई ?
आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की या लोकांना अमेरिकन पोलीस ओळखतात कसे? यासाठी पोलिसांना अनेक प्रकारची गुप्त माहिती मिळत असते. त्यानंतर अशा परिसरात पोलीस रेड टाकतात. त्यानंतर अशा लोकांना पकडले जाते. जे विना व्हीसा, किंवा अन्य कोणत्याही कागदपत्रांशिवाय बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहात आहेत. या लोकांना पकडून आधी डिटेंशन सेंटरला पाठवले जाते. हा एक प्रकाराचा तुरुंग असतो.त्यानंतर त्यांना त्यांची नागरिकत्व किंवा वैधता सिद्ध करण्यासाठी एक संधी दिली जाते. त्यानंतर जे लोक वैधता सिद्ध करू शकत नाही अशांना मग कोर्ट डिपोर्ट करण्याचा आदेश देते.