जिल्हा रुग्णालय, नाशिक www.pudhari.news
Published on
:
05 Feb 2025, 9:39 am
Updated on
:
05 Feb 2025, 9:39 am
नाशिक : प्रसूतीदरम्यान उपचारात झालेल्या हलगर्जीपणामुळे संसर्ग होऊन गिरणारेतील महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
गिरणारे येथील दीपाली संतोष झोले यांना २० जानेवारी रोजी प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर त्यांना गिरणारे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तब्येत बिघडल्याने त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालय व नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारातील हलगर्जीपणामुळे जंतुसंसर्ग होऊन त्यांचे अवयव निकामी झाले, आणि मंगळवारी (दि. ४) त्यांचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी डॉक्टरांवर उपचारात हलगर्जीपणाचा आरोप करत कारवाईची मागणी केली असून, अंबड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दीपाली झोले यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, व्हिसेरा राखून ठेवला आहे. यासंदर्भात चौकशी केली जात आहे.
- डॉ. चारूदत्त शिंदे, जिल्हा