Published on
:
05 Feb 2025, 9:25 am
Updated on
:
05 Feb 2025, 9:25 am
सासवड : किल्ले पुरंदर परिसरातील घोरवडी धरणाची एकूण साठवणक्षमता 67.50 दशलक्ष घनफूट इतकी असून, सद्य:स्थितीत या धरणात 48 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे गराडे पाटबंधारे शाखा अभियंता अविनाश जगताप यांनी दिली. घोरवडी धरणातून सासवड शहरासह सुपे-घोरवडी, शिवतारेवस्ती, चव्हाणवस्ती, पिंपळे, पोमणनगर, दातेमळा येथे पाणीपुरवठा योजना सुरू आहे. या धरणावर परिसरातील 55 हेक्टर इतके क्षेत्राचे सिंचन होते. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने जानेवारीअखेरपर्यंत धरणात अल्प पाणीसाठा उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरण 100 टक्के भरले होते.
मात्र, सध्या धरणात 48 टक्के पाणीसाठा असल्याचे सासवड पाटबंधारे शाखेचे संदेशक एस. एच. कोरपडे यांनी सांगितले. सासवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याचे सासवड नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदवंशी यांनी सांगितले.
घोरवडी धरणातून शेतकर्यांना उचल परवान्याची मुदत दि. 28 फेब—ुवारीला संपत आहे. या दिवशी पाणी उपसा बंद झाला, तरच परिसरातील गावांना पिण्यासाठी पाणी मिळेल; अन्यथा मृत साठ्यावर अवलंबून राहावे लागेल.
विश्वास काटकर, अध्यक्ष, घोरवडी जलाशय पाणीपुरवठा समिती
सासवडकरांनी पाण्याची काटकसर करून नगरपरिषदेला सहकार्य करावे. तसेच गावठाण, हाडको, नारायणनगर, वाढीव हद्द, विविध सोसायट्या आदी भागांतील पाण्याचे वेळापत्रक स्थानिक पातळीवर सुरू आहे. नागरिकांनी जपून पाणी वापरावे.
डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद