Chikhali Heavy rain: परतीच्या पावसाची दमदार बॅटिंग; सोयाबीन सुड्या झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

2 hours ago 1

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Heavy rain) :  अचानक परतीच्या पावसाने चिखली तालुक्यातील मेरा बु परीसरत दमदार पावसाला (Heavy rain) सुरुवात झाली. आणि एकच शेतकऱ्यांची तारांबळ होवून सोयाबिन सुड्या झाकण्यासाठी धावपळ झाली.

चिखली तालुक्यातील मेरा बु परीसरात यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने अद्यापही नदी, नाले, विहीर , तलाठी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे यावर्षी (Heavy rain) पाऊस पडेल की नाही या चिंतेत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू , हरभरा , शाळू या पेरणीकडे दुर्लक्ष केले. अनेकांनी थोड्याफार पाण्यात कपाशीला पाणी सोडले होते , त्याच बरोबर सोयाबिन सोंगणीचा हंगाम सुरू झाल्याने मोठया प्रमाणावर बाहेर जिल्हयातील मजुर आणून सोयाबिन सोंगणी सूरू आहे . मात्र अचानक ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्याने परतीच्या पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार तडाखा दिला. त्यांमध्ये अनेक शेतातील कपाशीचे पीक जमिनीवर झोपले.

तसेच अनेक सोयाबीन सूड्या वरील मेनकापड उडून गेले तर काही सुड्या झाकण्या अगोदरच सुड्यामध्ये पाणी घुसले .या तासभर पडलेल्या (Heavy rain) पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. त्यांमध्ये या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी विविध कंपनीचे कपाशी सिड घेतले आहे मात्र या अचानक पडलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने पिकाचे अतोनात नुकसान झाले . तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article