पालकमंत्री भुसे अभ्यासू आहेत. मंत्री म्हणून त्यांचे चांगले काम आहे. भुसे यांना पाचव्यांदा दुप्पट मताधिक्याने विजयी करा. मी नार-पार प्रकल्प कार्यान्वित करणे, रोजगारनिर्मिती करणे व वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय मालेगावला दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. सभेच्या प्रारंभी पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा बँक वाचवावी, नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी केली. व्यासपीठावर अजय बोरस्ते, सुरेश निकम, मधुकर हिरे, संजय दुसाने, प्रा. नीलेश कचवे, मनोहर बच्छाव, विनोद वाघ, रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, सुनील देवरे, संगीता चव्हाण आदी उपस्थित होते.
मालेगाव : पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. (छाया : नीलेश शिंपी)
---