मंगळुरूमध्ये 3 विद्यार्थीनींचा पूलमध्ये बुडून मृत्यू; रिसॉर्ट मालकासह मॅनेजरला अटक

2 hours ago 2

तीन मुलींच्या मृत्यू प्रकरणी रिसोर्ट मालकसह मॅनेजरला अटकpudhari photo

Published on

18 Nov 2024, 5:21 am

Updated on

18 Nov 2024, 5:21 am

पुढारी ऑनलाईन डेस्क : म्हैसूरमधील तीन विद्यार्थीनींचा बीच रिसॉर्टमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी मंगळुरू येथील एका रिसॉर्टच्या मालक आणि मॅनेजरला अटक केली आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मंगळुरुजवळील उल्लाल हद्दीत असलेल्या वाज्को रिसॉर्टचा मालक मनोहर आणि रिसॉर्टचा मॅनेजर भरत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.पुढील तपास सुरू आहे," मंगळूरचे पोलिस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी सांगितले.

म्हैसूरमधील तीन विद्यार्थीनी शनिवारी (दि.16) एका रिसॉर्टमध्ये गेल्या होत्या. यानंतर त्या रिसॉर्टमध्ये आल्याच्या एका दिवसानंतर वाझको रिसॉर्टच्या जलतरण तलावात मृतावस्थेत आढळले. कीर्थना (वय.21), निशिता (वय.21) आणि पार्वती (वय.20) यांचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. या प्रकरणी त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिकचा तपास पोलिस सध्या करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article