Published on
:
18 Nov 2024, 7:09 am
Updated on
:
18 Nov 2024, 7:09 am
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. कितीतरी आमदारांची निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ, तर काही उमेदवारांची ही दुसरी, तिसरी, चौथी वेळ असणार आहे. 1957 ते 1962 या कालावधीत पहिली विधानसभा स्थापन झाल्यापासून ते आताच्या चौदाव्या विधानसभेपर्यंत म्हणजे गेल्या 67 वर्षांत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहात आतापर्यंत एकूण 461 महिला आमदारांना सहभाग घेण्याची संधी मिळालेली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरुष मतदार 5 कोटी 22 हजार 739, महिला मतदार 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 इतके आहेत.
एकूण मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात महिला मतदारांचा टक्का हा जवळपास 50 टक्के इतका आहे. राज्यात विविध जिल्ह्यांत महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांइतकी तर काही ठिकाणी त्या पेक्षा जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
चौदाव्या विधानसभेचे चित्र काय?
20 नोव्हेंबर रोजी मतदान होत होऊन अस्तित्वात येणारी ही विधानसभेची पंधरावी विधानसभा असणार आहे. त्यापूर्वीची म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी कार्यकाळ संपणार्या चौदाव्या विधानसभेत एकूण आमदार महिलांची संख्या 27 इतकी होती.
2011 च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे 929 महिला असे प्रमाण आहे. त्या तुलनेत 2019 मध्ये मतदारयादीतील महिलांचे प्रमाण 925 इतके होते. हे प्रमाण वाढवण्याकरिता प्रयत्न झाले.त्यामुळे 2024 मध्ये या प्रमाणात 936 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे
पहिली - 30
दुसरी - 17
तिसरी - 12
चौथी - 28
पाचवी - 08
सहावी - 20
सातवी - 16
आठवी - 06
नववी - 14
दहावी - 13
अकरावी - 12
बारावी - 13
तेरावी - 22
चौदावी - 27
पहिल्या विधानसभेत आतापर्यंतच्या सर्वाधिक महिला आमदार
आतापर्यंत स्थापन झालेल्या विधानसभेच्या कार्यकाळात पहिल्या विधानसभेत तीस इतक्या भरघोस संख्यने महिला आमदार सभागृहात होत्या. त्यानंतरच्या कुठल्याच विधानसभेत इतक्या मोठ्या संख्येने महिला आमदार राहीलेल्या नाहीत. त्याच्या खालोखाल 1972 -78 या कार्यकाळातील चौथ्या विधानसभेत 28 तर आणि सन 2019- 2024 मध्ये चौदाव्या विधानसभेत 27 इतक्या महिला आमदारांची संख्या बघायला मिळाली.