उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते जपले नाही:म्हणून ते आमच्यासोबत येताय, मी पक्षासाठी आयुष्य खर्ची घातलं - एकनाथ शिंदे
2 hours ago
1
बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेना वाढवण्यासाठी अनेक नेत्यांनी काम केले आणि शिवसेना मोठी केली. कोणी वापरले आणि कोणी फेकले?, युज ॲन्ड थ्रो कोणी केला?, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या मागे उभे राहण्याचे काम केले. तुम्ही काय केले? कार्यकर्त्यांना तुम्ही तोडले. आमदार, खासदार अन् पदाधिकारी त्यांना सोडून आमच्यासोबत येत आहे यांचे हेच कारण आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एका मराठी वृत्तवाहिनिशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. काळ्या, पांढऱ्या दाढीवाल्याच्या नादी तुम्ही अजिबात लागू नका एकनाथ शिंदे म्हणाले की, एका काळ्या दाढीवाल्याने काय केले हे तुम्ही पाहिले आहे. आता या पांढऱ्या दाढीवाल्याच्या अजिबात नादी लागू नका, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. स्वत:चा उल्लेख काळा दाढीवाला तर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा उल्लेख पांढरा दाढीवाला असा करत त्यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले की, बाळासाहेबांचा विचार म्हणजे धनुष्यबाण आहे. हा धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला टांगून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हाेते. बाळासाहेबांनी सांगितले हाेते शिवसेनेची काँग्रेस हाेऊ देणार नाही. म्हणून हा धनुष्यबाण आम्ही पुन्हा हिसकावून आणला. उद्धव ठाकरेंची मशाल क्रांतीची नव्हे, तर घराघरात आग लावणारी आहे. माझ्या बापाचा फोटो काढा,तुमच्या बापाचा लावून दाखवा उद्धव् ठाकरे म्हणाले की, माझ्या बापाचा फोटो काढा आणि तुमच्या बापाचा फोटो लावून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना नाव न घेता दिले. पाटण येथील सभेत मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर हल्लाबोल करत ते म्हणाले की, “जो करेल मला मंत्री, त्याचा मी वाजंत्री” अशी येथील स्थिती आहे. येथे मस्तीमध्ये वागणारा लूटमार मंत्री आहे. त्याने स्वतःचा घरातील लग्नासाठी लूटमार केली. आपली सत्ता येऊ द्या, मग मी ही सगळी प्रकरणे मार्गी लावतो. हे गुजरातसमोर झुकणारे तुमच्यासमोर येतील. त्या वेळेस त्यांना विचारा की माझ्या मुलाला अजून नोकरी का नाही? या लोकांनी अदानीच्या घशात घातलेली मुंबई निकालानंतर मी माझ्या महाराष्ट्राला परत देईन. माझी बॅग तपासली त्याचा व्हिडीओ केला, तर सगळे माझी तपासा म्हणत आहेत. ज्यांच्यासोबत आम्ही गेलो, त्यांची वापरा आणि फेकून द्या अशी निती आहे. त्यामुळेच, त्यांनी काही मिंद्यांनी एप्रोच केला. पण, जिवाला जीव देणाऱ्यांनी मला साथ दिली, असे म्हणत शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडावरही ठाकरेंनी भाष्य केलं.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)