Published on
:
30 Nov 2024, 2:44 am
Updated on
:
30 Nov 2024, 2:44 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : Cyclone Fengal | बंगालच्या उपसागरात शुक्रवारी दुपारी फेंजाल चक्रीवादळाची निर्मिती झाली. हे वादळ आज शनिवारी दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे राज्यात दाट धुक्यासह थंडीचा कडाका वाढणार आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक किनारी भागात वादळी वारे आणि पावसाने हवामानात बदल झाला आहे.
#WATCH | Andhra Pradesh | Rough sea witnessed in many coastal areas as impact of cyclone Fengal
According to the Indian Meteorological Department (IMD), Cyclone Fengal will hit the coastal area by today evening.
(Visuals from Visakhapatnam) pic.twitter.com/uBBgV1MqlS
— ANI (@ANI) November 30, 2024शुक्रवारी बंगालच्या उपसागरात फेंजाल या चक्रीवादळाची निर्मिती झाली, त्यामुळे दक्षिण भारताच्या किनारपट्टीला अतिसावधानतेचा इशारा दिला आहे. हे वादळ शनिवारी कर्नाटक ते आंध्र प्रदेशपर्यंत प्रभाव टाकणार आहे. त्यामुळे त्या भागातून राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहे, तर उत्तर भारतात शुक्रवारीच नवा पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला, त्यामुळे उत्तर भारतातून राज्यात शीतलहरी, तर दक्षिणेतून बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे आगामी तीन ते चार दिवस राज्यात थंडीसह दाट धुक्याचा कहर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
#WATCH | Chennai | Due to the impact of cyclone Fengal, many coastal areas witnessed changes in weather with gusty winds and rain.
According to the Indian Meteorological Department (IMD), Cyclone Fengal will hit the coastal area by today evening. pic.twitter.com/qGfAyALUZu
— ANI (@ANI) November 30, 2024