सरकार कधी स्थापन होणार? महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नांची उत्तरं विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतरही अद्याप अनुत्तरितच आहे. अशातच यासर्व प्रश्नावर दीपक केसरकर यांनी आज राजभवनातून बाहेर पडताच भाष्य केलं.
सरकार कधी स्थापन होणार? महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नांची उत्तरं विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतरही अद्याप अनुत्तरितच आहे. दरम्यान आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते. राजभवनात एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. राजभवनातून बाहेर पडताच दीपक केसरकर यांनी सरकार कधी स्थापन होणार? मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? यावर भाष्य केले आहे. ‘एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. नवीन सरकार अस्तित्वात येण्याआधी ती औपचारिकता असते. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. आजपासून ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील’, अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली. तर नवीन सरकार लवकरच स्थापन होणार असून भाजपचा गटनेता निवडीसाठी कदाचित उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील. मग पक्ष श्रेष्ठींकडे जातील. पक्ष श्रेष्ठी जो काही निर्णय घेतील, त्यानुसार ठरेल, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं.
Published on: Nov 26, 2024 01:07 PM