EVM Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले. या निकालाने महाविकास आघाडीची सुपडा साफ झाला. तर भाजपाची राज्यात लाट आली. एकट्या भाजपानेच 132 जागांची कमाई केली आहे. महायुती 233 जागांवर विजयी झाली आहे. आता ईव्हीएमविरोधात लढाईसाठी विरोधक एकवटले आहेत.
ईव्हीएम विरोधात एल्गार
विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडी एखाद्या पत्त्याप्रमाणे उडाली. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. भाजपाची राज्यात लाट आली. एकट्या भाजपाच्या पारड्यात 132 जागा पडल्या. तर महायुतीने 233 जागांची घसघशीत कमाई केली. पण अनेक ठिकाणी मतांची बेरीज नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महायुती जनतेच्या मतांवर नाही तर ईव्हीएमच्या मतावर निवडून आल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी त्याविरोधात नाराजीचा सूर आळवला. आता शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत सुद्धा ईव्हीएम आणि एकूणच मतांची गोळाबेरीज जुळत नसल्याने त्याविरोधात एल्गार पुकारण्याची भाषा केली आहे.