दिल्ली निवडणूक निकाल- सुरुवातीच्या कलानुसार, भाजपने बहुमतांची आघाडी घेतली आहे. (File Photo)
Published on
:
08 Feb 2025, 3:56 am
Updated on
:
08 Feb 2025, 3:56 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज शनिवारी मतमोजणी सुरु आहे. ७० विधानसभेच्या जागांपैकी ३६ जागा बहुमतासाठी गरजेच्या आहेत. सुरुवातीच्या कलानुसार, भाजपने ४४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर आम आदमी पक्ष २५ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस केवळ एका जागेवर आघाडी घेतली आहे.
केजरीवाल, सिसोदिया पिछाडीवर
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. येथून भाजपचे प्रवेश वर्मा आघाडीवर आहेत. त्याचबरोबर जंगपुरा येथून माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि कालकाजी येथून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी देखील पिछाडीवर पडल्या आहेत. दिल्ली कँट येथून भाजपचे भुवन तंवर आघाडीवर आहेत.
जनकपुरी येथून आपचे उमेदवार प्रवीण कुमार आघाडीवर आहेत. करावल नगर येथून भाजपचे कपिल मिश्रा यांनी आघाडी घेतली आहे.