स्विमिंग पूलमध्ये उलटीचा त्रास, बाहेर येताच महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूFile Photo
Published on
:
08 Feb 2025, 6:31 am
Updated on
:
08 Feb 2025, 6:31 am
नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा
नवी मुंबईतील वाशी गावात राहणाऱ्या (44 वर्षीय) श्रेया भोईर ही महिला वाशी सेक्टर 12 येथील स्विमिंगपूल मध्ये पोहत होती. या दरम्यान तिला उलटी सारखे होऊ लागल्याने ती महिला स्विमिंगपूलाच्या बाहेर आली. काही क्षणात त्या महिलेला ॲटक आल्याने त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती महापालिकेच्या अधिका-यांनी दिली.
मात्र मागील १० दिवसांपासून नवी मुंबई महापालिकेच्या स्विमिंगपूल मध्ये पोहण्याचं प्रशिक्षण घेत होती.. श्रेया यांच्या मृत्यू नंतर महापालिकेच्या स्वीमिंगपूलच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला. महापालिकेच्या स्वीमिंगपूल वर ट्रेनर प्रशिक्षित आहेत का असा प्रश्न श्रेयाच्या नातेवाईकांनी केला.
स्विमिंगपूलमध्ये महिलेला उलटी सारखे होऊ लागल्याने त्यांना स्विमिंगपूल बाहेर काढण्यात आले होते. अशी माहिती अधिका-यांनी दिली. त्यावेळी त्या ठिकाणी एक डॉक्टर ही उपस्थित होते. तात्काळ या महिलेला येथील स्वराज्य हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. आज 11 वाजेपर्यंत पीएमचा अहवाल आल्यानंतर मृत्यू कशामुळे झाला हे समोर येईल.