“महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आजपर्यंत जेव्हा, जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, तेव्हा-तेव्हा भाजपा आणि मित्र पक्षांना फायदा झालेला आहे. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवाचा आम्हाला फायदा होईल. महाराष्ट्रात आम्ही सत्तेवर येऊ अशी अपेक्षा आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आम्ही बूथ सर्टिफिकेट गोळा केलेत. मी 20 ते 25 मतदारसंघात फोनवर बोललो आहे. त्यांचं म्हणण आहे की, महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपकडून अपक्षांशी संपर्क साधण्यात येतोय का? या प्रश्नावर आम्ही कोणाशी संपर्क साधलेला नाही असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. भाजप अदानीला वाचवत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘राहुल गांधी रोज बोलत असतात’
‘वाढलेल्या टक्केवारीमध्ये प्रो-इनक्बसी फॅक्टर’
एक्झिट पोलवर प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘एक्झिट पोलवर प्रवक्ते बोलतात, नेते नाही’ लाडकी बहिण योजनेमुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्रीपदाबाबत कुठली चर्चा सुरु आहे? त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कुठलीही चर्चा सुरु नाहीय. रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि ठरवू” “मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीमध्ये प्रो-इनक्बसी फॅक्टर दिसून येतोय. लोकांना सरकारबद्दल आपुलकी वाटते” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.