Fisherman Dead body: तब्बल 36 तासानंतर धरणात आढळला मच्छिमाराचा मृतदेह

2 hours ago 1

हिंगोली (Fisherman Dead body) : सेनगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील ३२ वर्षीय मच्छिमार धरणात जाळ टाकण्या करीता गेला असता बेपत्ता झाला होता. पोलिस व ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरूच ठेवली असताना २३ सप्टेंबरला तब्बल ३६ तासानंतर त्याचा (Fisherman Dead body) मृतदेह धरणात आढळला.

तांदुळवाडी येथील प्रल्हाद महादू घोगरे हे येलदरी धरणामध्ये २१ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास मासोळ्यासाठी जाळे टाकण्याकरीता गेले होते. नेहमी प्रमाणे ते घरी आले नसल्याने पोलिस निरीक्षक संतोष तांबे, टी.के.वंजारे, बीट जमादार पवन चाटसे यांच्यासह ग्रामस्थांनी शोध मोहीम केली. २३ सप्टेंबर रोजी लिंबाळा तांडा येथील जलाशयात प्रल्हाद घोगरे याचा मृतदेह (Fisherman Dead body) आढळून आला. कापडसिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी सेनगाव पोलिसांनी पंचनामा केला. प्रल्हाद घोगरे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे. घटनेबाबत (Sengaon Police) सेनगाव पोलिसात नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article