हिंदू धर्मामध्ये ऐकुन 18 पुराणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे पवित्र गरूड पुराण. या पुराणामध्ये फक्त व्यक्तीच्या जीवनाविषयीच सांगितले नाही तर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेमकं काय होते म्हणजेच मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या आत्म्याचे नेमकं काय होते याबद्दल देखील सांगितलले आहे. जे व्यक्ती प्रामाणिक जीवन जगतात त्यांच्या आत्म्याचे नेमकं काय होते आणि ज्या लोकांनी वागणूक वाईट असते मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याचे नेमकं काय होते याबद्दल गरूड पुराणामध्ये सांगितले आहे.
असे म्हटले जाते की, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भोगावी लागतात. मग त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये पाप केले असतात किंवा काही चांगले कर्म केलेले असतात त्यांना त्याप्रकारे कर्माची फळ मिळतात. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या व्यक्तिंचे पैसे लुटणाऱ्यांना मृत्यूनंतर नेमकं कोणती शिक्षा दिली जाते याबद्दल अगदी सविस्तर माहिती गरूड पुराणामध्ये माहिती दिली जाते.
दुसऱ्यांचे पैसे लुटणे याला घोर पाप मानले
जे व्यक्ती दुसऱ्यांचे पैसे लुटतात आणि मौजमस्ती करतात अशा लोकांना असे वाटते की त्यांना सगळं काही भेटलं आहे. परंतु जे दुसऱ्यांचे पैसे हडप करतात ते खूप मोठे पापी असतात. अशा लोकांना मृत्यूनंतर यमदूत दोरीने बांधून नरकात घेऊन जातात. त्यानंततर त्यांना खूप मारहाण केली जाते. या मारहानी दरम्यान ते बेशुद्ध होतात आणि ते पुन्हा शुद्धीत आल्यावर त्यांना मुठीने मारहाण केली जाते. दुसऱ्यांचे पैसे लुटणे याला घोर पाप मानले जाते.
असं करणं टाळावे…
गरूड पुराण हिंदूधर्मातील 18 महापुराणांपैकी एक आहे. या पुराणामध्य विष्णू भगवान आणि पक्षि राज यांच्यामधील एका संवादाचा उल्लेख केला आहे. पुराणानुसार, पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक व्यक्ती, प्राणी यांची मृत्यू होणारच, मग त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याचे काय होणार हे पूर्णत: त्यांच्या कर्मावर अवलंबून आहे. जन्म, मृत्यू, नरक, स्वर्ग, यमलोक अशा अनेक गोष्टींबाबत गरूड पुराणात सांगितले आहे. कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचे पैसे लुटल्यावर मृत्यूनंतर गंभीर शिक्षा दिली जाते. त्यामुळे असं करणं टाळावे आणि कोणालाही त्रास होईल असे वागू नये.
मृत्यूनंतर नरकात खूप कठोर शिक्षा
गरूड पुराणानुसार, जे व्यक्ती आपल्या वडिलांचा किंवा आईचा अपमान करतात किंवा त्यांना घरातून बाहेर काढतात अशा लोकांना मृत्यूनंतर नरकाच्या आगीमध्ये बुडून त्या आत्म्याला त्रास होईल अशी शिक्षा दिली जाते. त्यामुळे आपल्या आई-वडिलांचा आदर करणे गरजेचे असते. त्यांच्या सर्व गोष्टी समजून घेणे आणि त्यांच्या सर्व गोष्टी ऐकणे महत्त्वाचे असते. आजकालच्या काळामध्ये अनेकजण प्राण्यांना त्रास देत आहेत. जे लोकं स्वताच्या स्वार्थासाठी निष्पाप जीवांची हत्या करतात आणि त्यांना त्रास देतात अशा लोकांना मृत्यूनंतर नरकात खूप कठोर शिक्षा दिली जाते.