आज प्रत्येकजण मानसिक तणावाच्या समस्येशी झगडत आहे. तणावाचे प्रमाण इतके वाढले आहे की, लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून अस्वस्थ होतात. अनेकदा लोक आपला रागही कंट्रोल करू शकत नाही. यामुळे त्यांना नंतर मोठे नुकसान सोसावे लागते. लोकांची मानसिक स्थितीही कधी बिघडते. तणाव कमी करण्यासाठी देशातील शास्त्रज्ञही विविध प्रकारचे संशोधन करत आहेत. अशातच भारतीय शास्त्रज्ञांनी तणाव शोधण्याचे उपकरण विकसित केले आहे. डिव्हाइस परिधान केल्याने ताण तणाव ओळखता येतो. या आधुनिक आणि स्मार्ट वॉचेबल डिव्हाइसमुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्याची देखील माहिती मिळणार आहे. याशिवाय या तंत्रज्ञानामुळे रोबोटिक सिस्टीममध्येही सुधारणा होऊ शकते.
बेंगळुरूच्या जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी तणावाची पातळी मोजणारे वियरेबल स्मार्ट हेल्थ डिव्हाइस विकसित केले आहे. शास्त्रज्ञांनी चांदीच्या वायरचा वापर करून एक आधुनिक उपकरण विकसित केले आहे. हे शरीरातील तणाव आणि वेदना ओळखू शकते.
‘हे’ डिव्हाइस सेन्सरशिवाय काम करेल
हे तंत्रज्ञान कोणत्याही बाह्य सेन्सर किंवा सेटअपशिवाय लोकांचा ताण शोधण्यासाठी उपयुक्त आहे. प्रगत आरोग्य देखरेख प्रणाली विकसित करण्यात ही महत्त्वाची भूमिका बजावेल. आरोग्याची परिस्थिती आणि ताण ओळखण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. यावेळी आपल्या शरीरात तणावाची पातळी काय आहे आणि आपल्या शरीराची स्थिती काय आहे हे वेळीच सांगेल. तसेच, हे डॉक्टरांना त्या व्यक्तीचा इतिहास समजून घेण्यास मदत करेल.
तणाव जाणून घेण्यासाठी ‘हे’ उपकरण उपयुक्त
आज तणावामुळे अनेक प्रकारचे आजार होत आहेत. ताणामुळे मानसिक आरोग्य तर बिघडतेच, शिवाय शारीरिक आरोग्यावरही त्याचा खोलवर परिणाम होतो, तणावाची सुरुवातीची चिन्हे शोधून त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी अशी तंत्रे उपयुक्त ठरू शकतात. हे उच्च रक्तदाब, हृदयरोग, लठ्ठपणा आणि तणावास कारणीभूत हार्मोन्स नियंत्रित करण्यास देखील मदत करेल.
‘या’ डिव्हाइसचा काय फायदा होईल?
गाझियाबाद जिल्हा रुग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ए. के. कुमार सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य खराब असेल तर त्याचा परिणाम त्याच्या संपूर्ण शरीरावर होतो. मानसिक ताणामुळे मधुमेह आणि हृदयरोगही होऊ शकतो. आपण मानसिक तणावाखाली आहोत, हे बहुतांश लोकांना माहित नसते. अशावेळी एखाद्या उपकरणाने ते शोधून काढलं तर ते खूप फायदेशीर ठरेल. लोकांना वेळीच कळेल की त्यांना तणाव आहे आणि यामुळे उपचार देखील सोपे होतील
‘हे’ उपकरण कसे कार्य करते?
हे उपकरण चांदीच्या थरांपासून तयार करण्यात आले आहे. जेव्हा हे उपकरण ओढले जाते तेव्हा त्याच्या चांदीच्या थरामध्ये लहान अंतर तयार होते, ज्यामुळे त्याचा प्रवाहाशी संपर्क तुटतो. त्याला पुन्हा जोडण्यासाठी हलकी विद्युत नाडी देण्यात आली आहे. यामुळे ही पोकळी भरून निघते. विशेष म्हणजे डिव्हाइसमधून बॅकअप संपत नाही. यात सर्व डेटा सेव्ह केला जातो.
रोबोटमध्ये तंत्रज्ञानाचा वापर
हे असे लवचिक आणि स्मार्ट डिव्हाइस आहे जे स्वत: ला तोडल्यानंतरही बरे होऊ शकते. आपली मज्जासंस्था शरीरात वारंवार होणाऱ्या वेदना समजून घेऊन आपल्याला सांगत राहते. त्याचप्रमाणे हे उपकरणही ताण तणाव ओळखून आपल्याला सांगते. या तंत्रज्ञानाचा वापर रोबोटमध्येही केला जाऊ शकतो. जेणेकरून ते माणसांसोबत सहज पणे काम करू शकतील.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)