अपुऱ्या सुविधांमुळेच मुलींची शाळेला दांडी, सुलभ स्वच्छता मिशन फाऊंडेशनचा चिंताजनक अहवाल

3 hours ago 1

मासिक पाळीदरम्यान शाळांतील शौचालयांच्या निकृष्ट सुविधांमुळे मुलींना त्याचा वापर करण्याची भीती वाटते. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान शाळेत मुलींची गैरहजेरी वाढते. तसेच गावोगावी महिला डॉक्टरांचा अभाव असल्यामुळे मासिक पाळीशी संबंधित आरोग्य समस्यांसाठी महिला वैद्यकीय सल्ला घेऊ शकत नाहीत. मासिक पाळीबद्दल समाजात आजही शांतता दिसून येत असल्याचे चिंताजनक वास्तव सुलभ स्वच्छता मिशन फाऊंडेशनच्या संशोधन अभ्यासातून समोर आलंय.

सुलभ स्वच्छता मिशन फाऊंडेशनने देशातील मासिक पाळीच्या स्वच्छता व्यवस्थापनावर आधारित एक व्यापक संशोधन अहवाल शुक्रवारी प्रकाशित केला. याअंतर्गत महाराष्ट्र, हरयाणा, बिहार, छत्तीसगड, आसाम, ओडिशा, तामीळनाडू या सात राज्यांतील 14 जिह्यांतील महिला सहभागी झाल्या. 20 ते 49 वयोगटातील महिलांनी दिलेल्या माहितीवर संशोधन करण्यात आले.

असा आहे अहवाल

  • सहभागी 30 टक्के महिलांनी मासिक पाळीत कापडाचा वापर करत असल्याचे सांगितले. सॅनिटरी पॅड आर्थिकष्टय़ा परवडत नसल्याने महिलांनी सांगितले.
  • 91.7 टक्के मध्यमवयीन महिलांनी सांगितले की, महिला डॉक्टरांच्या अभावामुळे त्यांनी मासिक पाळीशी संबंधित आरोग्य समस्यांसाठी वैद्यकीय सल्ला घेणे टाळले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article