मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये ३९ मंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल ३४ दिवसांनी सरकारला पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्याचा मुहूर्त सापडला. फडणवीस रविवारी दावोस दौऱ्यावर जाणार आहेत, त्यापूर्वी शनिवारी त्यांनी ही यादी जाहीर केली. सर्वात धक्कादायक म्हणजे वाल्मीक कराड प्रकरणात वादग्रस्त ठरलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या एकमेव मंत्र्याला कुठल्याही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:च्या पुणेबरोबरच मुंडेंच्या बीड जिल्ह्याचे पालकत्वही आपल्याकडे घेतले आहे. बीड, परळीत वाढलेल्या गुंडगिरीस मुंडे जबाबदार असल्याचा आरोप कुरून त्यांच्या राजीनाम्याची, पालकमंत्री न करण्याची मागणी भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके आदींनी केली होती. ती मान्य करण्यात आली. बीडच्या दुसऱ्या कॅबिनेट मंत्री पंकजा यांनाही बीडपासून वंचित ठेवत जालन्याची जबाबदारी दिली. नाशिक महाजनांकडे फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रिपद कायम ठेवले. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह मुंबईची जबाबदारी स्वत:कडे घेतली आहे. शिंदे सरकारमध्ये नाशिकचे पालकमंत्रिपद दादा भुसे यांच्याकडे होते. मात्र आता २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी भाजपचे गिरीश महाजन यांनी ते ताब्यात घेतले आहे. ३ सहपालकमंत्री केले नियुक्त यंदा तीन सहपालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री म्हणून मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती झाली. शिंदे सरकारमध्ये ते पालकमंत्री होते. आता आशिष शेलार यांना संधी दिली. लोढा त्यांना सहकार्य करतील. भाजपच्या माधुरी मिसाळ कोल्हापूरच्या सहपालकमंत्री असतील. त्या शिंदेसेनेचे प्रकाश आबिटकर यांना मदत करतील. शिंदेसेनेचे आशिष जयस्वाल गडचिरोलीचे सहपालक असतील, ते मुख्यमंत्री फडणवीस यांना मदत करतील. वाल्मीक प्रकरण भोवले : धनंजय मुंडेंकडे एकही जिल्हा नाही, पण अप्रत्यक्ष बीडचे कारभारी तेच एकाही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद न दिल्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची शक्यता आहे का? - वाल्मीक कराड प्रकरणात खूपच आरोप झाले. सरकारची प्रतिमाही खराब झाली. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी सरकारमधूनही दबाव वाढत आहे. मात्र अजित पवार तयार नाहीत. पण दबाव वाढलाच तर त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो. धनंजय मुंडेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट झाल्याने बीडमधील त्यांचे वर्चस्व कमी होईल का? - विरोधकांना शांत करण्यासाठी पवारांनी पालकमंत्रिपद घेतले. पण राज्याचा व्याप, पुणे-बारामती हेच त्यांचे प्राधान्य आहे. बीडसाठी कितपत वेळ देतील याची शंकाच आहे. तिथे त्यांचे विश्वासू धनंजय हेच आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे बीडचा कारभार मुंडेंकडेच असेल. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट संभाजीनगरचे पालकमंत्रीपद शिंदेसेनेच्या संजय शिरसाट यांना देण्यात आले. भाजपचे अतुल सावे यांनी केलेला दावा यंदाही फोल ठरला. सावे यांना ३०० किमी दूर नांदेडची जबाबदारी मिळाली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)