गुजरातच्या ‘क्विक स्टार्ट’चा 800 जणांना 35 कोटींचा गंडा:3 टक्के लाभांश, मोफत विदेशवारीचे दाखवले आमिष

2 hours ago 1
गुजरातमधील क्विक स्टार्ट 24 कंपनीत एका वर्षासाठी एक लाख रुपये 10 महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा तीन टक्के लाभांश मिळेल. त्याचबरोबर परदेशात मोफत सहलीसाठी जाता येईल, असे आमिष दाखवून सुमारे 800 जणांना 35 कोटी रुपयांचा गंडा घातला. या कंपनीवर जिन्सी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून निवृत्त झालेले उपअभियंता सरताजसिंग चहल (61, रा. म्हाडा कॉलनी) यांनी यासंदर्भात तक्रार दिली. कंपनीने त्यांना 21 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. हर्षल योगेश गांधी, प्रतीक एम. शहा (दोघेही कंपनीचे मालक), ‘क्विक स्टार्ट 24’च्या ब्रँच मॅनेजर शीतल सुधाकर मोतिंगे (24, रा. एन 2, सिडको), विठ्ठल भागाजी तांदळे (60, रा. जाधववाडी) अशी आरोपींची नावे आहेत. चहल यांच्या तक्रारीनुसार, शंकर नागरी सहकारी बँकेचे मॅनेजर संत यांनी चहल यांना ‘क्विक स्टार्ट 24’ कंपनीमध्ये (इनलाइफ कॅप्शुअर एलएलपी कंपनी) पैसे गुंतवल्यास दर महिन्याला 3 टक्के लाभांश मिळत असल्याचे सांगितले. विनोद संत यांनी त्यांचे खाते पुस्तक दाखवल्यानंतर चहल यांचा विश्वास बसला. संत यांनी शीतल मोतिंगे यांच्याशी ओळख करून दिली. चहल यांनी कुटुंबीयांच्या नावाने कंपनीत गुंतवणूक केली. सुरुवातीला काही महिने पैसे मिळाले. त्यानंतर पैसे न मिळाल्याने ते कंपनीच्या सिडको एन-9 येथील कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेले. तेथे ब्रँच मॅनेजरने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांनी जिन्सी ठाण्यात तक्रार दिली. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक सय्यद मोहसीन करीत आहेत. फसवणूक झालेल्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी केले आहे. दोघांची 23 पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने ब्रँच मॅनेजर विठ्ठल तांदळे आणि शीतल मोतिंगे यांना अटक केली. त्यांना शनिवारी (18 जानेवारी) जिल्हा व सत्र न्यायाधीश सुभाष कऱ्हाळे यांच्या कोर्टात हजर केले. या वेळी सरकारी लोकाभियोक्ता आशिष दळे यांनी, या दोघांकडून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करायची आहेत, 800 जणांना गंडा घातल्याची प्राथमिक माहिती आहे. कंपनीचे मालक पसार असून, त्यांचा शोध घ्यायचा आहे. यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. कोर्टाने दोघांना 23 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले. पत्नी, मुले, बहिणींचीही गुंतवणूक या प्रकरणात चहल यांनी स्वत: एक लाख रुपये कंपनीत गुंतवले. त्याचबरोबर पत्नी, मुलगा, मुलगी आणि बहिणीच्या खात्यावरून कंपनीत गुंतवणूक केली होती. फिर्यादीने कुटुंबीय आणि नातेवाइकांच्या 33 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक ‘क्विक स्टार्ट’ कंपनीत केली होती, असेही तक्रारीत नमूद केले आहे. पंचतारांकित हाॅटेलात गेट टुगेदर लोकांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी म्हणून आरोपींनी शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये गेट टुगेदर आयोजित केले होते. गुंतवणूकदारांचे पैसे नामांकित 24 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात येईल. त्यातून लाभांश देण्याची थाप मारून ते पैसे उकळत होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article