मनू भाकरच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगरPudhari Photo
Published on
:
19 Jan 2025, 6:41 am
Updated on
:
19 Jan 2025, 6:41 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हिला शनिवारी (दि.19) खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र या घटनेनंतर लगेचच तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळले आहे. वृत्तसंस्था 'एआयएनएस'ने दिलेल्या माहितीनुसार तिच्या आजी आणि मामांचे एका रस्ते अपघातात निधन झाले आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालानुसार, महेंद्रगड बायपास रस्त्यावर एक स्कूटर आणि चारचाकी कारची टक्कर झाली. ज्यामध्ये दोघांनाही आपला जीव गमवावा लागला. यानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला आहे. सध्या अपघाताचा तपास सुरू आहे.
Charkhi Dadri, Haryana: In a tragic incident on Mahendragarh Bypass Road, international shooter Manu Bhaker’s grandmother and uncle lost their lives when their scooter collided with a Brezza car. The car driver fled the scene. Police have taken the bodies for post-mortem and are… pic.twitter.com/x5HRzPTlSx
— IANS (@ians_india) January 19, 2025