आजच्या काळात लोकांचे जीवन इतके व्यस्त झाले आहे की त्यांच्या आरोग्याकडे आणि स्वता: साठी वेळ मिळत नाही. व्यस्थ जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. आजकाल जंक फूडचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्वं मिळत नाही. तुमच्या चेहऱ्याला सुंदर, ग्लोईंग आणि मॉइश्चरायझ ठेवण्यासाठी हजारो रूपये खर्च करायला मागे पुढे बघत नाही. परंतु पार्लरमधील महागड्या क्रिम्समध्ये रसायनिक पदार्थ वापरले जातात ज्यामुळे चेहऱ्यावर काही विशेष फायदे होत नाही.
आजकल अनेक महिला घरच्या घरी काही घरगुती पदार्थ वापरून चमकदार आणि ग्लोईंग त्वचा मिळवतात. स्वयंपाक घरामध्ये असे अनेक पदार्थ आहेत ज्याचा उपयोग केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते. पिंपल्स, मुरूम आणि चेहऱ्यावरील काळे डाग निघून जाण्यासाठी तुमच्या घरच्या घरी काही सोप्या ट्रिक्स वापरा. चला तर जाणून घेऊया घरच्या घरी काय उपाय करावे ज्यामुळे तुमचा चेहरा चमकदार होईल. चेहऱ्यावर चमकदार बनवण्यासाठी या तेलानी मसाज करा. यामुळे तुमच्या त्वचेला आश्चर्यकारक फायदे होतील आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येईल.
सर्वांच्या घरी खोबरेल तेलाचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का खोबरेल तेल तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. शुद्ध खोबरेल तेलाचा वापर तुमच्या चेहऱ्यावर केल्यास त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी खोबरेल तेलाचं वापर केल्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि डागरहित होण्यास मदत होते. रातत्री झोपण्यापूर्वी दररोज दोन थेंब खोबरेल तेलानी चेहऱ्याचा मसाज केल्यास तुमच्या चेहऱ्याससंबंधीत सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. अजकाल अनेकांच्या चेहऱ्यावर अगदी कमी वयात सुरुकुत्या दिसू लागतात ज्यामुळे चेहरा खराब होतो. चेहऱ्यावर खोबरेलल तेलाचा वापर केल्यास सुरुकुत्या कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. दररोज रात्री दोन थेंब तेल हातामध्ये घेऊन चेहऱ्याची मालिश करा यामुळे तुमचा चेहरा तरूण दिसण्यास सुरुवात होते.
सकाळी चमकदार त्वचा मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ कोमट पाण्यानी धुवा. त्यानंतर हातावर खोबरेल तेल घ्या आणि तुमच्या चेहऱ्यावर सर्क्यूलर मोशनमध्ये मसाज करा यामुळे तुमची त्वचा चममकदार होते. चेहऱ्यावर खोबरेल तेलानी मसाज केल्यामुळे चाहऱ्याच्या भागामध्ये रक्तप्रवाह सुरळीत होतो ज्यामुळे पिंपल्स, मुरुम आणि डागांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. हिवाळ्यात अनेकदा चेहरा कोरडा होतो त्यामुळे खोबरेल तेल चेहऱ्यामध्ये शोषल्यामुळे चेहरा नासर्गिकरित्या मॉईश्चरायझ होतो.