Amravati Accident: भरधाव चारचाकी घरात शिरली, एक गंभीर

3 hours ago 1

अपघातानंतर वाहन पेटले, रहिवास्यांचा रास्ता रोको
बोरगाव धर्माळे येथील घटना

नांदगाव पेठ (Amravati Accident) : अमरावती वरून नागपूर कडे जाणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाचे संतुलन बिघडल्याने ती कार थेट महामार्गारील एका घरात शिरली.घटनेत एक जण गंभीर असल्याची माहिती आहे. अपघातानंतर कारने पेट घेतल्याने कारची राखरांगोळी झाली तर या घटनेने महामार्गालगत अतिक्रमण करून राहणाऱ्या रहिवास्यांनी आक्रोश करत महामार्गावर चक्काजाम केला. (Amravati Accident) घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चारचाकी वाहन क्र.एम एच१४,सीएस ९१६१ सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान अमरावती वरून (Amravati Accident)  भरधाव वेगाने नागपूर कडे जात असतांना बोरगाव धर्माळे नजीक भारत पेट्रोलपंप जवळ अचानक कारचे संतुलन बिघडल्याने कार थेट महामार्गालगत असलेल्या झोपडीमध्ये शिरली.कारची धडक एवढी भीषण होती की, कडेला असलेले कडूनिंबाचे झाड देखील कोसळले.यानंतर कारने पेट घेतला व कारचा चालक फरार झाला. यामध्ये रस्त्यावर कुल्फी विकणाऱ्या राजू कुशवाह (४५) रा.बेलपुरा नामक इसमाला वाहनाची धडक लागल्याने ते गंभीर जखमी झाले. डोक्याला इजा झाल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेनंतर (Amravati Accident) महामार्गाच्या कडेला राहणाऱ्या सर्व अतिक्रमणधारक नागरिकांनी रस्ता रोको केला.म हामार्गावर आम्हाला नाईलाजाने आणि जीव मुठीत घेऊन राहावे लागते. अश्या घटना वारंवार घडतात आणि आमची जीवितहानी होऊ शकते त्यामुळे शासनाने आम्हाला जागा देऊन घरकुल मंजूर करावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र अंभोरे आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. आंदोलनकर्त्यांची समजूत काढुन त्यांना घरी पाठविण्यात आले.

जखमीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर इजा असल्याने (Amravati Accident) त्यांना तातडीने नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पंचायत समितीचे माजी सभापती आशिष धर्माळे यांच्या नेतृत्वात जोशीला रितेश राऊत, रितेश सहदेव राऊत, प्रविण नारायण श्रृंगारे, गजानन नारायण श्रृंगारे, महेश नागोराव राऊत, राजु विठ्ठल वानखडे, राजू मधुकर दुधमोचन, मंगेश तुळशीराम राऊत, सागर दिलीप वानखडे, समय गजानन वानखडे, मन्नू शंकरराव राऊत, बसंती रमेश राऊत, गीता मुन्नीलाल कठोते सर्व रा. संभाजी नगर बोरगाव धर्माळे व ईतर ५० ते ६० लोकांनी बेकायदेशीररित्या वाहतुकीस अडथळा निर्माण करून पोलिसांशी हुज्जतबाजी केल्यामुळे काही वेळ पोलीस व आंदोलक यांच्यादरम्यान वाद निर्माण झाला होता. पालिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश राऊत यांच्या फिर्यादीवरून सर्व आंदोलकांवर बीएनएस कलम कलम २२१, १२६(२),१८९ (३),१९० अन्वये गुन्हे दाखल केले आहे.

सपोनि राऊत यांची गोरगरिबांवर दादागिरी

अपघाताच्या घटनेनंतर (Amravati Accident) नागरिकांनी रास्ता रोको केला.मी त्यांना धीर देत होतो आणि समजावून सांगत होतो दरम्यान सपोनि रितेश राऊत यांनी गोरगरीब आंदोलकांवर दादागिरी सुरू केली.यामुळे राऊत आणि आंदोलक यांच्यातवाद निर्माण झाला होता.
– आशिष धर्माळे माजी सभापती, शिवसेना तालुका प्रमुख अमरावती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article