लिव्हर हा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि हार्मोनल संतुलन राखण्यासाठी तसेच जीवनसत्वे, प्रथिने, आणि इतर गोष्टींचा साठा करून शरीर निरोगी ठेवण्यासाठी हा एक अतिशय उपयुक्त अवयव आहे. शरीरातील लिव्हर योग्यरीत्या कार्य करत नसेल तर व्यक्ती जास्त काळ जगू शकत नाही. त्यामुळे व्यक्तीने आपल्या लिव्हरची काळजी आणि संरक्षणाबद्दल नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे. यासाठी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक वेळा लिव्हरचे काही आजार होतात आणि ते लवकर कळतही नाही पण लिव्हर खराब झाल्याची लक्षणे व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर दिसू लागतात.
एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि शरीरात अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. यामुळे कावीळ, थकवा, अशक्तपणा, ओटी पोटात दुखणे किंवा सूज येणे, भूक न लागणे, उलट्या होणे किंवा मळमळ होणे, काळी किंवा गडद लघवी यांचा समावेश होतो. तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
कावीळ कावीळ हे एक सामान्य लक्षण आहे ज्यामध्ये त्वचेचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा होतो. जेव्हा लिव्हर बिलीरुबिन योग्यरित्या साफ करू शकत नाही तेव्हा कावीळ होतो.
त्वचेवर खाज येणे लिव्हर निकामी झाल्यामुळे त्वचेवर खाज येऊ शकते. रक्तामध्ये दूषित पदार्थ जमा झाल्यामुळे खाज येण्याची समस्या वाढते.
त्वचेवर डाग येणे लिव्हर निकामी झाल्यामुळे त्वचेवर हलके किंवा गडद रंगाचे डाग तसेच जन्मखुणा देखील दिसू लागतात. ज्यांना लिव्हर स्पॉट्स असे देखील म्हणतात.
काळे डाग लिव्हर निकामी झाल्यामुळे शरीरात हार्मोनल बदल देखील होत असतात. ज्यामुळे त्वचेच्या रंगावर परिणाम होतो आणि त्वचेवर काळे डाग दिसू लागतात.
लिव्हर संबंधित आजार लिव्हर मध्ये काही समस्या असल्यास एकाच वेळी अनेक आजार होऊ शकतात. लिव्हर सिरोसिस, हेपेटाइटिस, फैटी लीवर, लीवर कॅन्सर आणि लीवर फेलियर सारख्या गंभीर आजार होऊ शकतात. हे सर्व संकेत गंभीर आजाराचे असू शकतात. त्यामुळे अशी कोणतेही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.