अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे स्थित घरात घुसून हत्या करणाऱ्या हल्लेखोराला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. तीन दिवसांनंतर आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. शनिवारी रात्री ठाणे येथून पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी मोहम्मद अलीयान उर्फ विजय दास (बीजे) याला ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटजवळील लेबर कॅम्पजवळील झुडपातून पकडले. आरोपी पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचा देखील पोलिसांना संशय आहे. हल्लेखोराने चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसखोरी केली होती.
अटक केल्यानंतर आरोपील कोर्टात हजर करणार असून, पोलीस कस्टडीची मागणी करण्यात येणार आहे. आरोपीबद्दल सांगायचं झालं तर, त्याने पूर्वी ठाण्याच्या एका बारमध्ये काम केलं आहे. शिवाय आरोपी हाऊसकिपिंगच्या एजन्सीत काम करत असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने ओळख पटू नये म्हणून पोलिसांना स्वतःची अनेक खोटी नावं सांगितल्याचं देखील कळत आहे. ज्यामध्ये बिजॉय दास, विजय दास, मोहम्मद इलियास, मोहम्मद सज्जाद, बी.जे. यांसारख्या नावांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेला आरोपी भारतीय आहे की मुंबईत बेकायदेशीरपणे राहणारा बांगलादेशी आहे, याचाही पोलीस शोध घेत आहेत.
हे सुद्धा वाचा
पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार आरोपी गेल्या पाच महिन्यांपासून मुंबई आणि ठाण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये राहत आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी एका कंस्ट्रक्शन साईटवर काम करत असल्याची माहिती समोर आली. सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी सतत न्यूज चॅनल पाहत होता.
एवढंच नाही तर, आरोपी सतत स्वतःचे लोकेशन देखील बदलत होता. अटक होण्याच्या भीतीने त्याने आपला फोनही बंद केला होता. मात्र, आरोपीकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा अन्य कोणतेही कागदपत्र सापडले नाहीत, ज्यामुळे त्याच्या नावाची किंवा पत्त्याची पुष्टी होऊ शकेल. त्यामुळेच तो बांगलादेशचा रहिवासी असल्याचाही पोलिसांना संशय आहे. आता पुढील पोलीस तपासात काय समोर येईल… हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.