पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ जणांना बसने चिरडले; तिघांचा जागीच मृत्यू file photo
Published on
:
19 Jan 2025, 4:37 am
Updated on
:
19 Jan 2025, 4:37 am
बीड : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना बसने धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. बीडजवळ घोडका राजुरी येथे आज सकाळी ही घटना घडली. अपघातात ठार झालेले तिघेही घोडका राजुरी येथील आहेत.
सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे (वय २०), विराट बब्रूवान घोडके (वय १९), ओम सुग्रीव घोडके (वय २०) अशी मृत तरूणांची नावे आहेत. परभणीकडे जाणाऱ्या गाडीमुळे हा अपघात झाला. सकाळी रनिंगची प्रॅक्टिस करणाऱ्या मुलांना बसने धडक दिली. यातील दोघांनी वेळीच उड्या मारल्याने ते बचावले. मात्र तिघे अपघातात जागीच ठार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तिन्ही मृत तरूणांना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.