Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खान हल्ला प्रकरण, पत्रकार परिषदेत पोलिसांकडून मोठी माहिती समोर, पाच महिन्यांपूर्वीच हल्लेखोराची मुंबईत एन्ट्री..., आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार असून याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
Saif Ali Khan Attack Case: अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेला तीन दिवस झाले आहे. तीन दिवसानंतर सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाल आहे. आता पत्रकार परिषदेत पोलिसांनी हल्लेखोराने कोणत्या उद्देशाने सैफ – करीना घुसखोरी केली याचा खुलासा केला आहे. शिवाय किती महिन्यांपूर्वी आरोपी मुंबईत आला याचा देखील पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा मुळचा बांगलादेशी असल्याचा आमचा संशय आहे. आरोपीने बेकायदेशीर भारतात प्रवेश केल्यानंतर स्वतःचं नाव बदललं आहे. आरोपीने स्वतःचं नाव विजय दास असं सांगितलं आहे. आरोपी पाच महिन्यांपूर्वी भारतात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपी सुरुवातीला मुंबईत राहिला. त्यानंतर मुंबईतील शहरांमध्ये देखील आरोपी राहिला होता. आरोपी हाऊसकिपिंगच्या एजन्सीत काम करत असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद आलियान असं आरोपीचं नाव त्याचं वय 30 वर्ष आहे. चोरीच्या उद्देशाने आरोपीने घरात प्रवेश केल्याचं आतापर्यंत झालेल्या तपासातून समोर येत आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार असून पोलीस कस्टडीसाठी मागणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पुढील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.