बोदवड येथील मुंजोबा मंदिर पाडल्याने तणावाचे वातावरण:लेखी आश्वासनानंतर आमदार चंद्रकांत पाटलांच्या मध्यस्थीने मिटला वाद

3 hours ago 1
येथील वडिलोपार्जित सुमारे शंभर वर्षांपूर्वीचे मुंजोबा मंदिर अनधिकृतपणे पाडल्याने शनिवारी सकाळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केल्याने पोलिस स्टेशनमध्ये गेलेला वाद संध्याकाळी लेखी लिहून दिल्याने मिटला. साळशिंगी येथील सोनवणे परिवाराचे वडिलोपार्जित शंभर वर्षे जुने मुंजोबा मंदिर साळशिंगी ते बोदवड रोडवर साळशिंगी पासून ४ किलोमीटर अंतरावर आहे. सदरचे मंदिर जीर्णावस्थेत असल्यामुळे मंदिराचे नवीन बांधकाम करण्याचे सर्वांनी ठरवले होते. बांधकाम दीड महिन्यांपूर्वी सुरू केले. मंदिराचे पिल्लर उभारण्यात आले होते. बांधकाम अपूर्ण अवस्थेत असताना हरीश भगवान खत्री यांनी काही एक न सांगता जेसीबीने मंदिर हटवले. यामुळे मंदिरातील मुंजोबाच्या मूर्त्या विखुरल्या गेल्या. यामुळे साळशिंगी ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात धाव घेत निवेदन दिले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सोनवणे कुटुंब आमरण उपोषण करील असा इशारा दिला. निवेदनावर मधुकर सोनवणे, रघुनाथ सोनवणे, प्रकाश सोनवणे, समाधान सोनवणे, शिवाजी सोनवणे, ईश्वर सोनवणे, विलास सोनवणे, हर्षल सोनवणे यांच्या सह्या आहेत. मंदिराच्या नूतनीकरणाचे लेखी आश्वासन माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी हरीश खत्री व सोनवणे परिवाराची समजूत घातली. त्यानंतर हरीश खत्री यांनी मंदिराचे नूतनीकरण करून देईल असे लेखी आश्वासन दिल्याने सदर वादावर पडदा पडला. यावेळी मुक्ताईनगर डीवायएसपी राजकुमार शिंदे हे पण उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article