हिंगोली (Student termination Case) : येथील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलींच्या वसतीगृहातील १२ वी वर्गात शिक्षण घेणार्या विद्यार्थीनीने शनिवारी १८ सकाळी ११ वाजण्याच्या सुमारात खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. त्या विद्यार्थीनीला उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
हिंगोली येथील शासकिय रुग्णालयाच्या (Student termination Case) बाजूलाच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागांतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलींचे वसतीगृह आहे. या ठिकाणी तालुक्यातील ढोलउमरी येथील विद्यार्थीनी इतर तीन विद्यार्थीनीसह राहते. ही शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता बारावी वर्गात शिक्षण घेते.दरम्यान, १८ जानेवारी रोजी सकाळी तिच्या खोलीतील इतर तीन विद्यार्थीनी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. यावेळी ती एकटीच खोलीमध्ये होती. यावेळी ती एकटीच खोलीमध्ये होती. यावेळी तिने खोलीचा दरवाजा लाऊन गळफास घेतला.
अवघ्या काही वेळातच इतर विद्यार्थीनींना खिडकीच्या काचेतून हा प्रकार दिसला. विद्यार्थीनी व परिसरातील दुसर्या वसतीगृहातील कर्मचार्यांनी खिडकीच्या काचा फोडून खोलीत प्रवेश केला. त्यानंतर तिला खाली उतरवून तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी तातडीने पोलिसांना माहिती घेऊन घटनास्थळी रवाना केले. अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर, जमादार अशोक धामणे, धनंजय क्षिरसागर, विलास वडकुते यांच्या पथकाने घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच तिचे कुटुंबिय देखील (Student termination Case) शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत.
दरम्यान, विद्यार्थीनीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या तिची परिस्थिती नाजूक असल्याने पोलिसांना तिचा जवाब नोंदविता आला नाही. त्यामुळे तिने हे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही. मात्र या (Student termination Case) घटनेमुळे वस्तीग्रह व शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.